![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - एकोणीस, वीस व एकवीस या तीन अध्यायांत सौत्रामणी यागाचे मंत्र आहेत. हा यज्ञ करण्याचा अधिकार ऐश्वर्येच्छु चयन याग केलेल्या यजमानाला व मुख व तदितरद्वारा सोमरसाचें ज्याला वमन झालें, अशा यजमानाला आणि राज्यभ्रष्ट क्षत्रियाला व पशूंची इच्छा करणार्या यजमानाला आहे. 'स्वाद्वीं त्वा' या मंत्रानें सुरासंधान करावें. स्वाद्वीं त्वा स्वादुना तीव्रां तीव्रेणामृताममृतेन । मधुमतीं मधुमता सृजामि सँ सोमेन । सोमोऽस्यश्विभ्यां पच्यस्व सरस्वत्यै पच्यस्वेन्द्राय सुत्राम्णे पच्यस्व ॥ १ ॥ अर्थ - हे सुरे, तुला मी सोमरसाशीं युक्त करतों. तूं गोड, शीघ्र मद उत्पन्न करणारी, अमृततुल्य व मधुरस्वादयुक्त आहेस व हा सोमही गोड, शीघ्र मद उत्पादक, अमृततुल्य व मधुररस विशिष्ट आहे. हे सुरे, तूं सोमाच्या संसर्गानें सोमरूपी आहेस म्हणून मी तुला सांगतों कीं, अश्विनीकुमाराकरितां, सरस्वतीकरतां व उत्तम तर्हेनें रक्षण करणार्या इंद्राकरितां तूं परिणाम पाव म्हणजे मादक गुणविशिष्ट हो. ॥१॥ विनियोग - 'परीतः' या मंत्रानें अध्वर्यूनें सुरेवर गाईच्या दुग्धाचें सिंचन करावें. परीतो षिञ्चता सुतँ सोमो यऽ उत्तमँ हविः । दधन्वा यो नर्यो अप्स्वन्तरा सुषाव सोममद्रिभिः ॥ २ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, या गाईच्या दुधानें कांडलेल्या सोमरसाचें सिंचन करा. जो सोमरस सर्वश्रेष्ठ हवि आहे व सर्व प्राण्यांना हितकर असून यजमानाचें धारण करणारा आहे. जलांत असलेल्या ज्या सोमाला अध्वर्यूनें पाषाणांच्या योगें कुटलें. ॥२॥ विनियोग - 'वायोः पूतः' या कंडिकेंत दोन ऋचा आहेत व 'पुनाति ते' ही तिसरी ऋचा यांचा उलटक्रमानें सुरापवित्रीकरणांकडे विनियोग आहे. वायोः पूतः पवित्रेण प्रत्यङ्क्सोमो अतिद्रुतः । इन्द्रस्य युज्यः सखा । वायोः पूतः पवित्रेण प्राङ्क्सोमो अतिद्रुत । इन्द्रस्य युज्यः सखा ॥ ३ ॥ अर्थ - अपानद्वारा खालीं गेलेला सोम पोटांतील वायूच्या पावित्र्यानें शुद्ध केला गेला. तो सोम इंद्राच्या बरोबर राहणारा मित्र आहे. मुखद्वारां वांत झालेला म्हणजे ओकला गेलेला सोम हृदयांत असलेल्या वायूच्या पावित्र्यानें शुद्ध केला गेला. तो सोम इंद्राच्या बरोबर राहणारा मित्र आहे. ॥३॥ विनियोग - पुनाति ते परिस्रुतँ सोमँ सूर्यस्य दुहिता । वारेण शश्वता तना ॥ ४ ॥ अर्थ - अध्वर्यू यजमानाला म्हणतो - हे यजमाना, सूर्याची मुलगी जी श्रद्धा ती तुझ्या सोमरूपापन्न सुरेला अनादि धनस्वरूपी गाईच्या किंवा अश्वाच्या पुच्छ केशानें पवित्र करते. ॥४॥ विनियोग - "ब्रह्म क्षत्रं" या मंत्रानें वेतस पात्रांतील पय अजमेषलोमकृत पवित्रानें शुद्ध करावें. ब्रह्म क्षत्रं पवते तेजऽ इन्द्रियँ सुरया सोमः सुतऽ आसुतो मदाय । शुक्रेण देव देवताः पिपृग्धि रसेनान्नं यजमानाय धेहि ॥ ५ ॥ अर्थ - हे सोमदेवा, तूं शुद्ध अशा वीर्यानें अग्न्यादि देवांना प्रसन्न कर व घृतादियुक्त अन्न यजमानाला दे. कारण तुझें कंडण झाल्यावर तूं ब्राह्म व क्षात्र तेजाला वाढवितोस व सुरा मिश्रित झाल्यानें तीव्र होऊन तूं मद उत्पन्न करितोस. ॥५॥ विनियोग - "कुविदंग" या मंत्रानें तीन पयःपात्रांचें ग्रहण करावें. कुविदङ्ग यवमन्तो यवं चिद्यथा दान्त्यनुपूर्वं वियूय । इहेहैषां कृणुहि भोजनानि ये बर्हिषो नमऽ उक्तिं यजन्ति । उपयामगृहीतोऽस्यश्विभ्यां त्वा सरस्वत्यै त्वेन्द्राय त्वा सुत्राम्णऽ एष ते योनिस्तेजसे त्वावीर्याय त्वा बलाय त्वा ॥ ६ ॥ अर्थ - हे सोमा, ज्याप्रमाणें पुष्कळ धान्याचे स्वामी असे शेतकरी आपलें पुष्कळ धान्य वेगळें करून शीघ्र कापतात, त्याप्रमाणें या यजमानाचे ठायीं इतर यजमानांच्या उपभोग्य वस्तु स्थापन कर. ते यजमान दर्भांवर बसून हविर्भागात्मक अन्नांचा याग करितात. तात्पर्य यज्ञ करणार्या इतरांचीं सर्व फलें या यजमानास मिळोत. हे दुग्धा, अश्विनीकुमार, सरस्वतीदेवी व चांगलें रक्षण करणारा इंद्र यांचेकरितां तूं परिपक्व हो. तुझें मीं उपयामपात्रानें ग्रहण केलें आहे. हें तुझें स्थान आहे त्यावर तेज, वीर्य व बल मिळविण्याकरितां तुझें मी स्थापन करितो. ॥६॥ विनियोग - "नाना हि वाम्" या मंत्रानें उलट क्रमानें मृण्मय स्थालींतील तीन सुरापात्रांचें ग्रहण करावें. नाना हि वां देवहितँ सदस्कृतं मा सँ सृक्षाथां परमे व्योमन् । सुरा त्वमसि सुष्मिणी सोमऽ एष मा मा हिँसीः स्वं योनिमाविशन्ती ॥ ७ ॥ अर्थ - हे सुरा सोमांनों, ज्या अर्थी तुमच्या दोघांकरितां देवांना हितकारक असें वेगळें वेगळें स्थान केलें आहे, त्या अर्थी तुम्ही उत्कृष्ट व आकाशाप्रमाणें विशाल अशा या हवन स्थानामध्यें एकमेकांत मिसळूं नका. हे सुरे, तूं बलयुक्त (अशांत) अशी सुरा आहेस. हा सोम शांत आहे म्हणून या आपल्या उत्पत्तिस्थानांत प्रवेश करून तूं या सोमाची हिंसा करूं नकोस. ॥७॥ विनियोग - उपयामगृहीतोऽस्याश्विनं तेजः सारस्वतं वीर्यमैन्द्रं बलम् । एष ते योनिर्मोदाय त्वानन्दाय त्वा महसे त्वा ॥ ८ ॥ अर्थ - तूं उपयामपात्रानें गृहीत आहेस. प्रत्यक्ष आश्विन तेज, सरस्वतीचें सामर्थ्य व इंद्रसंबंधीं बल तूंच आहेस. हें तुझें स्थान आहे. यावर प्रमोद, हर्ष व महत्त्व प्राप्त करण्याकरितां तुझें मी स्थापन करितों. ॥८॥ विनियोग - "तेजोसि" इत्यादि तीन मंत्र भागांनीं गोधूम व कुवलचूर्ण, इंद्रजव व बदरीफल चूर्ण, आणि जव व मोठया बोराचें चूर्ण क्रमें करून तीनही पयःपात्रांत टाकावें. नंतर "ओजोऽसि" वगैरे प्रत्येक मंत्रांनीं वृकादिकांचे केश सुरापानांत मिसळावेत. साधारण लहान बोरीच्या फळांना बदर म्हणतात, त्याहून मोठयांना कुवल म्हणतात व सर्वांत मोठयांना कर्कंधु असें म्हणतात. तेजोऽसि तेजो मयि धेहि वीर्यमसि वीर्यं मयि धेहि बलमसि बलं मयि धेह्योजोऽस्योजो मयि धेहि मन्युरसि मन्युं मयि धेहि सहोऽसि सहो मयि धेहि ॥ ९ ॥ अर्थ - हे दुग्धा, तूं तेजोरूपी आहेस म्हणून माझे ठायीं तेजाचें स्थापन कर. हे पात्रा, तूं वीर्यरूपी आहेस म्हणून माझें ठायीं वीर्य स्थापन कर. हे पात्रा, तूं बलरूपी आहेस म्हणून माझें ठायीं बल स्थापन कर. हे सुरे, तूं ओजोरूपी आहेस म्हणून माझें ठायीं कांति स्थापन कर. व तूं कोपरूपी आहेस म्हणून माझें ठायीं कोप स्थापन कर. ॥९॥ विनियोग - यानंतर अध्वर्यु व प्रतिप्रस्थाता या दोघांनीं श्येनाचें पीस हातांत घेऊन पूर्वाभिमुख यजमानाला पवित्र करावें. या व्याघ्रं विषूचिकोभौ वृकं च रक्षति । श्येनं पतत्रिणँ सिँहँ सेमं पात्वँहसः ॥ १० ॥ अर्थ - जी विषूचिका (महामारी) वाघ व लांडगा या दोघांचें तसेंच श्येन पक्षी व सिंह या दोघांचें रक्षण करिते ती या यजमानाचें व्याधिहेतुभूत पापापासून रक्षण करो. ॥१०॥ विनियोग - "यदापिपेष" या मंत्रानें अध्वर्यूनें यजमानाला अग्नीकडे पहाण्यास सांगावें व त्यानें उत्तर वेदीवरील अग्नीकडे पहावें. "संपृचस्थ" या मंत्रभागानें यजमानानें सर्व पयःपात्रांना एकदम स्पर्श करावा व "विपृचस्थ" या मंत्रभागानें सुरापात्रांना स्पर्श करावा. यदापिपेष मातरं पुत्रः प्रमुदितो धयन् । एतत्तदग्नेऽ अनृणो भवाम्यहतौ पितरौ मया । सम्पृच स्थ सं मा भद्रेण पृङ्क्त विपृच स्थ वि मा पाप्मना पृङ्क्त ॥ ११॥ अर्थ - पुत्र असा मी आनंदित होऊन स्तनपान करीत असतां आईला लाथा मारून पीडा केली. हे अग्ने, तुझ्या समक्ष मी त्या ऋणांतून मुक्त होतों व म्हणतों कीं मीं आईबापांना पीडा केली नाहीं. हे पयःपात्रांनो, तुम्ही स्वतःच संयुक्त होणारे आहां म्हणून मला कल्याणानें युक्त करा. हे सुरापात्रांनो, तुम्ही वियुक्त होणारे आहां म्हणून मला पापांपासून मुक्त करा. ॥११॥ विनियोग - देवा यज्ञमतन्वत भेषजं भिषजाश्विना । वाचा सरस्वती भिषगिन्द्रायेन्द्रियाणि दधतः ॥ १२ ॥ अर्थ - देवांनीं सौत्रामणी यज्ञरूपी औषध इंद्राकरितां विस्तृत केलें त्यावेळीं अश्विनीकुमार वैद्य होते आणि सरस्वती ऋग्वेदादि तीन वेदांनीं वैद्यकर्म करणारी होती. त्या सरस्वती व अश्विनीकुमारांनीं इंद्राला सामर्थ्य दिलें. ॥१२॥ विनियोग - दीक्षायै रूपँ शष्पाणि प्रायणीयस्य तोक्मानि । क्रयस्य रूपँ सोमस्य लाजाः सोमाँशवो मधु ॥ १३ ॥ अर्थ - दीक्षणीय इष्टीचें स्वरूप बालतृणें आहेत व नवीन उत्पन्न झालेले जव हे प्रायणीय इष्टीचें रूप आहेत व लाज (साळीच्या लाह्या) सोमक्रयाचें रूप आहे तसेंच मधु हें सोमखंडांचें रूप आहे. तात्पर्य बालतृण वगैरेंचें दीक्षणीयादि रूपांनीं ध्यान करावें. ॥१३॥ विनियोग - आतिथ्यरूपं मासरं महावीरस्य नग्नहुः । रूपमुपसदामेतत्तिस्रो रात्रीः सुरासुता ॥ १४ ॥ अर्थ - मासर (बालतृण वगैरेंच्या संयोगानें होणारें द्रव्य) हें आतिथ्येष्टीचें रूप आहे व नग्नहू (सर्जत्वक् वगैरेंच्या संयोगानें होणारें द्रव्य) हें धर्माचें रूप आहे. तीन दिवसपर्यंत कंडण करून खडडयांत स्थापन केलेली सुरा हें उपसद्-इष्टीचें रूप आहे. ॥१४॥ विनियोग - सोमस्य रूपं क्रीतस्य परिस्रुत्परिषिच्यते । अश्विभ्यां दुग्धं भेषजमिन्द्रायैन्द्रँ सरस्वत्या ॥ १५ ॥ अर्थ - अश्विनीकुमारांकरितां, सरस्वतीकरितां व इंद्राकरितां जें दुग्ध तीन दिवस काढलें ती जी परिस्रुत्रूपी सुरा सिंचन केली जाते ती क्रीत (विकत घेतलेल्या) सोमाचें रूप आहे. ॥१५॥ विनियोग - आसन्दी रूपँ राजासन्द्यै वेद्यै कुम्भी सुराधानी । अन्तरऽ उत्तरवेद्या रूपं कारोतरो भिषक् ॥ १६ ॥ अर्थ - हा चौरंग सोमाच्या चौरंगाचें रूप आहे. व सुरा कुंभी (ज्यांत दारू आहे असा घट) सोमयज्ञांतील वेदीचें रूप आहे. दोन वेदींतील मध्यभाग हें उत्तर वेदीचें रूप आहे. तसेंच सुरा गाळण्याची चाळणी ही इंद्राच्या व यजमानाच्या वैद्याचें रूप आहे. ॥१६॥ विनियोग - वेद्या वेदिः समाप्यते बर्हिषा बर्हिरिन्द्रियम् । यूपेन यूपऽ आप्यते प्रणीतोऽ अग्निरग्निना ॥ १७ ॥ अर्थ - येथें असलेल्या वेदीनें सोमांतील वेदीचें काम होतें व येथें असलेल्या दर्भानें सोमांतील दर्भांचें काम होतें तसेंच येथील वीर्यानें सौमिक वीर्य व येथील यूपानें सौमिक यूप तसेंच येथील अग्नीनें सौमिक अग्नि यांचें कार्य होतें म्हणजे त्या त्या पदार्थांचें तत् तत् रूपानें ध्यान करावें. ॥१७॥ विनियोग - हविर्धानं यदश्विनाग्नीध्रं यत्सरस्वती । इन्द्रायैन्द्रँ सदस्कृतं पत्नीशालं गार्हपत्यः ॥ १८ ॥ अर्थ - या सौत्रामणी यागांत ज्या अश्विनीकुमार देवता आहेत त्यायोगें सौमिक हविर्धान, व येथें जी सरस्वती देवता आहे तिच्यायोगें सौमिक आग्नीध्र संपन्न होते. व या सौत्रामणी यागांत जें इंद्रदेवताक हविर्द्रव्य केलें जातें त्यायोगें सोमांतील सदोमंडप, पत्नीशाला व गार्हपत्य यांचें कार्य होतें म्हणजे तत् तत् रूपानें त्या त्या वस्तूंचें ध्यान करावें. ॥१८॥ विनियोग - प्रैषेभिः प्रैषानाप्नोत्याप्रीभिराप्रीर्यज्ञस्य । प्रयाजेभिरनुयाजान्वषट्कारेभिराहुतीः ॥ १९ ॥ अर्थ - येथील प्रैषांनीं, आप्रींनीं (प्रयाजयाज्यांनीं) यज्ञाच्या प्रयाजांनीं, अनुयाजांनीं, वषट्कारांनीं व आहुतींनीं व सोमांतील प्रैष आप्री, प्रयाज, अनुयाज, वषट्कार व आहुतींचें कार्य होतें. ॥१९॥ विनियोग - पशुभिः पशूनाप्नोति पुरोडाशैर्हवीँष्या । छन्दोभिः सामिधेनीर्याज्याभिर्वषट्कारान् ॥ २० ॥ अर्थ - येथील (सौत्रामणींतील) पशूंनीं, पुरोडाशांनीं, हविर्द्रव्यांनीं, छंदांनीं, सामिधेनींनीं व याज्या मंत्रांनीं आणि वषट्कारांनीं सोमांतील पशु, पुरोडाश, हविर्द्रव्यें, छंद, सामिधेनी व याज्या मंत्र आणि वषट्कार यांचे कार्य होतें. ॥२०॥ विनियोग - धानाः करम्भः सक्तवः परीवापः पयो दधि । सोमस्य रूपँ हविषऽ आमिक्षा वाजिनं मधु ॥ २१ ॥ अर्थ - येथील धाना (भाजलेले जव) उदमंथ, सातू, हविर्द्रव्यें, दूध, दहीं, हीं सोमाचीं रूपें आहेत. आमिक्षा आणि मधुर वाजिन हें हविर्द्रव्याचें रूप आहे. (तापलेल्या दुधांत दही घातलें असतां ह्याचे दोन भाग होतात, एक घन (गोळा) भाग व दुसरा द्रव (पातळ) भाग, त्यांतील गोळा भागाला आमिक्षा म्हणतात व पातळ भागाला वाजिन म्हणतात.) ॥२१॥ विनियोग - धानानाँ रूपं कुवलं परीवापस्य गोधूमाः । सक्तूनाँ रूपं बदरमुपवाकाः करम्भस्य ॥ २२ ॥ अर्थ - कोंवळें बदरीफल हें धानांचें रूप आहे व गोधूम (गहूं) परीवापाचें व स्थूल बदरीफल सातूंचें व जव हें करंभांचें रूप आहे असें समजावें. ॥२२॥ विनियोग - पयसो रूपं यद्यवा दध्नो रूपं कर्कन्धूनि । सोमस्य रूपं वाजिनँ सौम्यस्य रूपमामिक्षा ॥ २३ ॥ अर्थ - जव हें दुधाचें रूप, स्थूल बदर दह्याचें, वाजिन सोमाचें व आमिक्षा सोमांतील चरूचें रूप आहे. ॥२३॥ विनियोग - आश्रावयेति स्तोत्रियाः प्रत्याश्रावोऽ अनुरूपः । यजेति धाय्यारूपं प्रगाथा येयजामहाः ॥ २४ ॥ अर्थ - 'आश्रावय' हा शब्द स्तोत्रांतील पहिल्या तीन ऋचांचें स्वरूप आहे. तसेंच अस्तुश्रौषट् हा शब्द उत्तर तीन ऋचांचें, 'यज' हें धायाचें व 'ये यजामहे' हें प्रगाथांचें रूप आहे. ॥२४॥ विनियोग - अर्धऽ ऋचैरुक्थानाँ रूपं पदैराप्नोति निविदः । प्रणवैः शस्त्राणाँ रूपं पयसा सोमऽ आप्यते ॥ २५ ॥ अर्थ - येथील (सौत्रामणींतील) अर्ध ऋचांनीं उक्थाशस्त्रांचें, पदांनीं न्यूङ्खाचें, ॐकारांनीं शस्त्रांचें रूप प्राप्त केलें जातें व दुधानें सोमरस प्राप्त केला जातो. ॥२५॥ विनियोग - अश्विभ्यां प्रातःसवनमिन्द्रेणैन्द्रं माध्यंदिनम् । वैश्वदेवँ सरस्वत्या तृतीयमाप्तँ सवनम् ॥ २६ ॥ अर्थ - अश्विनीकुमार देवांनीं प्रातः सवनाची प्राप्ति होते. तसेंच इंद्र देवानें माध्यंदिन सवनाची व सरस्वती देवतेनें तृतीय सवनाची प्राप्ति होते. ॥२६॥ विनियोग - वायव्यैर्वायव्यान्याप्नोति सतेन द्रोणकलशम् । कुम्भीभ्यामम्भृणौ सुते स्थालीभि स्थालीराप्नोति ॥ २७ ॥ अर्थ - वायव्य पात्रांनीं वायव्य सोम पात्रांची, वैतस् पात्रानें द्रोणकलशाची, शतःछिद्र सुरा कुंभीच्या योगानें सोम कंडण झाल्यावर होणार्या पूतभृत व आधवनीयांची आणि स्थालींच्या योगानें स्थालींची प्राप्ति होते. ॥२७॥ विनियोग - यजुर्भिराप्यन्ते ग्रहा ग्रहै स्तोमाश्च विष्टुतीः । छन्दोभिरुक्थाशस्त्राणि साम्नावभृथऽ आप्यते ॥ २८ ॥ अर्थ - यजूंच्यायोगें यजु, गृहांच्यायोगें गृह, स्तोमांच्यायोगें स्तोम, विविध स्तुतींच्यायोगें विविध स्तुती, छंदांच्यायोगें उक्थ आणि शस्त्रें, सामाच्यायोगें साम आणि अवभृथाच्यायोगें अवभृथ यांची प्राप्ति होते. ॥२८॥ विनियोग - इडाभिर्भक्षानाप्नोति सूक्तवाकेनाशिषः । संयुना पत्नीसंयाजान्त्समिष्टयजुषा सँस्थाम् ॥ २९ ॥ अर्थ - इडा, भक्ष, सूक्तवाक आशीर्वाद, शंयु नांवाचा होम, पत्नीसंयाज व समिष्ट यजु आणि संस्था यांच्यायोगें क्रमेंकरून इडा, भक्ष, सूक्तवाक, आशीर्वाद, शंयू नावाचा होम, पत्नीसंयाज, समिष्टयजु आणि संस्था यांची प्राप्ति होते. ॥२९॥ विनियोग - व्रतेन दीक्षामाप्नोति दीक्षयाप्नोति दक्षिणाम् । दक्षिणा श्रद्धामाप्नोति श्रद्धया सत्यमाप्यते ॥ ३० ॥ अर्थ - व्रतानें दीक्षा, दीक्षेनें दक्षिणा, दक्षिणेनें श्रद्धा व श्रद्धेनें सत्यज्ञानानंतरूपी ब्रह्मस्वरूप प्राप्त होते. ॥३०॥ विनियोग - एतावद्रूपं यज्ञस्य यद्देवैर्ब्रह्मणा कृतम् । तदेतत्सर्वमाप्नोति यज्ञे सौत्रामणी सुते ॥ ३१ ॥ अर्थ - देवांनीं व प्रजापतीनें जें यज्ञाचें रूप बनविलें तें हें एवढेंच आहे. सौत्रामणी यागांत सोमरसाचें कंडण केलें असतां वर सांगितलेलें सोमाचें सर्व रूप प्राप्त होतें. ॥३१॥ विनियोग - 'सुरावंत' या मंत्रानें अध्वर्यूनें तीनही पयःपात्रांचा एकदम होम करावा म्हणजे सर्व पात्रांतील दुधाचा होम करावा. सुरावन्तं बर्हिषदँ सुवीरं यज्ञँ हिन्वन्ति महिषा नमोभिः । दधानाः सोमं दिवि देवतासु मदेमेन्द्रँ यजमानाः स्वर्काः ॥ ३२ ॥ अर्थ - मोठे ऋत्विज् सौत्रामणी यज्ञाला वाढवितात. तो यज्ञ देवता विशिष्ट, सुरायुक्त व उत्तम ऋत्विजांनीं युक्त असा आहे व ते ऋत्विज अन्नानें व नमस्कारांनीं स्वर्गावर एकत्र राहणार्या देवतांचे ठायीं सोमरसाचें स्थापन करणारे आहेत. त्या यज्ञांत उत्तम मंत्र म्हणून व इंद्राचा याग करून आम्ही संतुष्ट होऊं. ॥३२॥ विनियोग - 'यस्ते' या मंत्रानें प्रतिप्रस्थात्यानें दक्षिणाग्नीवर सुराग्रहांचा होम करावा. यस्ते रसः सम्भृतऽ ओषधीषु सोमस्य शुष्मः सुरया सुतस्य । तेन जिन्व यजमानं मदेन सरस्वतीमश्विनाविन्द्रमग्निम् ॥ ३३ ॥ अर्थ - हे सुरे, जो तुझा रस औषधींत एकत्र झाला आहे व सुरेसह कण्डण केलेल्या सोमरसाचें जें बल आहे त्या मदजनक सुरारसानें व सोमबलानें यजमान, सरस्वती, अश्विनीकुमार, इन्द्र, व अग्नि यांना संतुष्ट कर. ॥३३॥ विनियोग - 'यमश्विना' या मंत्रानें अध्वर्यु, प्रतिप्रस्थाता व आग्नीध्र यांनीं आश्विन पयोग्रहाचें दोन दोन वेळां भक्षण करावें. होता, ब्रह्मा व मैत्रावरुण यांनीं सारस्वत पयोग्रहाचें भक्षण करावें व यजमानानें ऐन्द्र पयोग्रहाचें भक्षण करावें. यमश्विना नमुचेरासुरादधि सरस्वत्यसुनोदिन्द्रियाय । इमं तँ शुकं मधुमन्तमिन्दुँ सोमँ राजानमिह भक्षयामि ॥ ३४ ॥ अर्थ - अश्विनीकुमारांनीं असुरपुत्र नमुचीपासून जो सोमरस आणला व सरस्वतीनें इंद्रियसामर्थ्याकरितां ज्याचें कंडण केलें त्या त्या शुद्ध, मधुररसयुक्त व ऐश्वर्यप्रद अशा सोमराजाला या यज्ञांत मी भक्षण करतों. ॥३४॥ विनियोग - 'यदत्र' या मंत्रानें अध्वर्यु वगैरेंनीं अपसव्य करून आश्विनादि सुराग्रह भक्षण करावे. यदत्र रिप्तँ रसिनः सुतस्य यदिन्द्रोऽ अपिवच्छचीभिः । अहं तदस्य मनसा शिवेन सोमं राजानमिह भक्षयामि ॥ ३५ ॥ अर्थ - रसयुक्त व कण्डन केलेल्या सोमाचा जो अंश या सुरेंत संलग्न झाला व ज्या सुरालग्न सोमभागाला कर्मांनीं शुद्ध करून त्याचें इंद्रानें पान केलें त्या सुरानिर्गत सोमांशाचें मी या यज्ञांत शुद्ध मनानें भक्षण करतों. ॥३५॥ विनियोग - 'पितृभ्यः' इत्यादि मंत्राच्या प्रत्येक भागानें आश्विनादि सुराग्रहाचा होम करावा. पितृभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः पितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः प्रपितामहेभ्यः स्वधायिभ्यः स्वधा नमः । अक्षन् पितरोऽमीमदन्त पितरोऽतीतृपन्त पितरः पितरः शुन्धध्वम् ॥ ३६ ॥ अर्थ - स्वधासंज्ञक अन्न ग्रहण करणार्या पितृपितामहप्रपितामहांना स्वधारूपी अन्न असो व त्यांस नमस्कार असो. पितरांनी तें अन्न भक्षण केलें व ते संतुष्ट झाले व अभीष्ट देऊन त्यांनीं आम्हांस संतुष्ट केलें. हे पितरांनो, तुम्ही हस्तप्रक्षालन करून शुद्ध व्हा. ॥३६॥ विनियोग - अध्वर्यूनें यजमानाकडून 'पुनन्तु मा' इत्यादि नऊ ऋचा म्हणवाव्या. पुनन्तु मा पितरः सोम्यासः पुनन्तु मा पितामहाः पुनन्तु प्रपितामहाः । पवित्रेण शतायुषा । पुनन्तु मा पितामहाः पुनन्तु प्रपितामहाः । पवित्रेण शतायुषा विश्वमायुर्व्यश्नवै ॥३७ ॥ अर्थ - सौम्य असे पितृ, पितामह, व प्रपितामह मला शंभर वर्षे आयुष्य देणार्या अशा पवित्रानें शुद्ध करोत. (पुनः तोच अर्थ आदरार्थ सांगितला आहे) अशा रीतीनें पितरांनीं शुद्ध केलेल्या मला संपूर्ण आयुष्य प्राप्त होवो. ॥३७॥ विनियोग - अग्नऽ आयूँषि पवसऽ आ सुवोर्जमिषं च नः । आरे बाध्स्व दुच्छुनाम् ॥ ३८ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं आयुष्य???पक कर्मे करवितोस म्हणून आम्हाला व्रीह्यादि धान्य, दहीं वगैरे रस दे. व आमच्यापासून दूर असलेल्यालाही दुष्ट श्वानांसारख्या दुर्जनांचा तूं नाश कर. ॥३८॥ विनियोग - पुनन्तु मा देवजनाः पुनन्तु मनसा धियः । पुनन्तु विश्वा भूतानि जातवेदः पुनीहि मा ॥ ३९ ॥ अर्थ - देवानुयायी जन मनासह कर्मे व सर्व भूतें मला पवित्र करोत. हे अग्ने, तूंही मला पवित्र कर. ॥३९॥ विनियोग - पवित्रेण पुनीहि मा शुक्रेण देव दीद्यत् । अग्ने क्रत्वा क्रतूँ१ऽ रनु ॥ ४० ॥ अर्थ - हे प्रकाशमान अग्ने, शुद्ध पवित्रानें मला व यज्ञासंबंधीं माझ्या कर्मांना पवित्र कर. ॥४०॥ विनियोग - यत्ते पवित्रमर्चिष्यग्ने विततमन्तरा । ब्रह्म ते न पुनातु मा ॥ ४१ ॥ अर्थ - हे अग्ने, तुझ्या ज्वालेमध्यें जें वेदत्रयरूपी ब्रह्म पसरलें आहे त्यानें मला पवित्र कर. ॥४१॥ विनियोग - पवमानः सोऽ अद्य नः पवित्रेण विचर्षणिः । यः पोता स पुनातु मा ॥ ४२ ॥ अर्थ - माझें कृत व अकृत कर्म जाणणारा शोधक असा सोम आज मला पवित्रानें शुद्ध करो. तसेंच शुद्ध करणारा वायूही शुद्ध करो. ॥४२॥ विनियोग - उभाभ्यां देव सवितः पवित्रेण सवेन च । मां पुनीहि विश्वतः ॥ ४३ ॥ अर्थ - हे सवितृ देवा, पवित्र व यज्ञानुज्ञा या दोघांनीं मला सर्व बाजूंनीं पवित्र कर. ॥४३॥ विनियोग - वैश्वदेवी पुनती देव्यागाद्यस्यामिमा बह्व्यस्तन्वो वीतपृष्ठाः । तया मदन्तः सधमादेषु वयँ स्याम पतयो रयीणाम् ॥ ४४ ॥ अर्थ - सर्व देवांना हितकारक, पवित्र करणारी व प्रकाशमान सुराकुंभी (दारूचा घट) आली. जिच्यांत इष्ट स्वरूपी शरीरासारख्या पुष्कळ घृतधारा आहेत, यज्ञस्थानामध्यें त्या सुराकुंभीनें आम्ही आनंदित होऊन पुष्कळ धनाचे स्वामी होऊं. ॥४४॥ विनियोग - यजमानाने अपसव्य करून 'ये समानाः' या मंत्रानें दक्षिणाग्नींत होम करावा. ये समानाः समनसः पितरो यमराज्ये । तेषाँल्लोकः स्वधा नमो यज्ञो देवेषु कल्पताम् ॥ ४५ ॥ अर्थ - ज्यांत यमाचें राज्य आहे अशा यमलोकांत ज्यांचें जाती, रूप व मन सारखें आहे अशा पितरांना आम्हीं दिलेलें अन्न समर्पित होवो व त्यांस आमचा नमस्कार असो व यज्ञ देवांना संतुष्ट करण्यास समर्थ होवो. ॥४५॥ विनियोग - 'ये समानाः' या मंत्रानें यजमानानें सव्य करून आहवनीय अग्नीवर आज्याचा होम करावा. ये समानाः समनसो जीवा जीवेषु मामकाः । तेषां श्रीर्मयि कल्पतामस्मिँल्लोके शतँ समाः ॥ ४६ ॥ अर्थ - या लोकामध्यें जे प्राणी मजसारख्या जातीनें, रूपानें व मनानें युक्त आहेत व त्यामध्यें जे माझे सपिंड व दायाद आहेत, त्यांची संपत्ति शंभर वर्षेपावेतों मला प्राप्त होवो. ॥४६॥ विनियोग - 'द्वे सृती' या मंत्रानें अध्वर्यूनें दुग्धाचा होम करावा. द्वे सृतीऽ अश्रृणवं पितॄणामहं देवानामुत मर्त्यानाम् । ताभ्यामिदं विश्वमेजत्समेति यदन्तरा पितरं मातरं च ॥ ४७ ॥ अर्थ - मर्त्य प्राण्यांकरितां दोन मार्ग आहेत असें मी ऐकिलें आहे. एक देवमार्ग व एक पितृमार्ग. द्युलोक व पृथ्वी लोकांमध्यें चलन पावणारें हें सर्व जग या देवयान व पितृयान मार्गांनीं युक्त होतें. त्या मार्गांना हें हवि सुहुत असो. ॥४७॥ विनियोग - 'इदं हविः' या मंत्रानें यजमानानें हविःशेष भक्षण करावें. इदं हविः प्रजननं मेऽ अस्तु दशवीरँ सर्वगणँ स्वस्तये । आत्मसनि प्रजासनि पशुसनि लोकसन्यभयसनि । अग्निः प्रजां बहुलां मे करोत्वन्नं पयो रेतोऽ अस्मासु धत्त ॥ ४८ ॥ अर्थ - हें पयोरूपी हविर्द्रव्य माझें कल्याण करो. हें हविर्द्रव्य प्रजोत्पादक, प्राणापानादिकांना स्वास्थ्य देणारें, सर्व अवयवांना स्वास्थ्य देणारें, शरीर, बल, प्रजा, पशु, ऐहिक सुख व स्वर्ग यांप्रत देणारें असें आहे. अग्नि माझ्या प्रजेला वाढवो. हे ऋत्विजांनो, आमचें ठायीं व्रीह्यादि अन्न, व दुग्ध वीर्य स्थापन करा. ॥४८॥ विनियोग - अध्वर्यूनें यजमानाकडून 'उदीरताम्' इत्यादि तेरा मंत्र म्हणवावे. उदीरतामवरऽ उत्परासऽ उन्मध्यमाः पितरः सोम्यासः । असुं यऽ ईयुरवृकाऽ ऋतज्ञास्ते नोऽवन्तु पितरो हवेषु ॥ ४९ ॥ अर्थ - ऊर्ध्व लोकस्थित व मध्यलोकस्थित पितर त्यापेक्षांही वर जावोत. ते सोम संपादन करणारे वातरूपी, शत्रुरहित, सत्य अगर यज्ञ जाणणारे पितर यज्ञांत आमचें रक्षण करोत. ॥४९॥ विनियोग - अङ्गिरसो नः पितरो नवग्वाऽ अथर्वाणो भृगवः सोम्यासः ।तेषां वयँ सुमतौ यज्ञियानामपि भद्रे सौमनसे स्याम ॥ ५० ॥ अर्थ - यज्ञाचें हित करणारे व सोम संपादन करणारे, ज्यांची गति स्तुत्य आहे व जे अथर्वकुलोत्पन्न आणि भृगुकुलोत्पन्न आहेत ते पितर आमचे ठिकाणीं सद्बुद्धि धारण करोत. ॥५०॥ विनियोग - ये नः पूर्वे पितरः सोम्यासोऽनूहिरे सोमपीथं वसिष्ठाः । तेभिर्यमः सँरराणो हवीँष्युशन्नुशद्भिः प्रतिकाममत्तु ॥ ५१ ॥ अर्थ - सोम संपादन करणारे व वसिष्ठ गोत्रोत्पन्न असे जे आमचे पितर ते सोमरस देवांकडे पोचविते झाले. त्या इच्छा करणार्याचा पितरांसह इच्छा करणारा यम संतुष्ट होऊन यथेच्छ हवि भक्षण करो. ॥५१॥ विनियोग - त्वँ सोम प्रचिकितो मनीषा त्वँ रजिष्ठमनु नेषि पन्थाम् । तव प्रणीती पितरो नऽ इन्दो देवेषु रत्नमभजन्त धीराः ॥ ५२ ॥ अर्थ - हे चेतनावान् सोमा, तूं आपल्या बुद्धीनें अत्यंत सरळ अशा देवयान मार्गाप्रत आम्हांला पोंचवितोस तसेंच आमचे बुद्धिमान् पितर तुझ्या आज्ञेनें देवलोकांतील रम्य असें यज्ञफल मिळविते झाले. ॥५२॥ विनियोग - त्वया हि नः पितरः सोम पूर्वे कर्माणि चक्रुः पवमान धीराः । वन्वन्नवातः परिधीँ१ऽ रपोर्णु वीरेभिरश्वैर्मघवा भवा नः ॥ ५३ ॥ अर्थ - हे पवित्र करणार्या सोमा, आमचे बुद्धिमान् पूर्वज तुझ्या साह्याने यज्ञादि कर्मांचें अनुष्ठान करिते झाले म्हणून आम्हांला उपद्रव करणार्या शत्रूंचा नाश कर. तूं आमच्या कर्मांचा विभाग करणारा व वातादि उपद्रवांनीं रहित असा आहेस. तूं आम्हांला पुत्र, अश्व व धन दे. ॥५३॥ विनियोग - त्वँ सोम पितृभिः संविदानोऽनु द्यावापृथिवीऽ आ ततन्थ । तस्मै तऽ इन्दो हविषा विधेम वयँ स्याम पतयो रयिणाम् ॥ ५४ ॥ अर्थ - हे सोमा, पितरांबरोबर संभाषण करणारा असा तूं द्युलोक व पृथ्वी लोकांप्रत निर्माण करिता झालास. अशा हे इंद्रो, तुला आम्ही हवि देतों. त्यायोगें आम्ही द्रव्याचे स्वामी होऊं. ॥५४॥ विनियोग - बर्हिषदः पितरऽ ऊत्यर्वागिमा वो हव्या चकृमा जुषध्वम् । तऽ आ गतावसा शन्तमेनाथा नः शं योररपो दधात ॥ ५५ ॥ अर्थ - हे दर्भस्थ पितरांनो, तुम्ही आमच्या संरक्षणाकरितां खालीं या. कां कीं, आम्ही तुम्हांला हविर्द्रव्य देतों तें तुम्ही सेवन करा. नंतर सुखकारक अशा अन्नानें संतुष्ट होऊन आमचें कल्याण, अभय व पापनिवृत्ति करा. ॥५५॥ विनियोग - आहं पितॄन्त्सुविदत्राँ २ऽ अवित्सि नपातं च विक्रमणं च विष्णोः । बर्हिषदो ये स्वधया सुतस्य भजन्त पित्वस्तऽ इहागमिष्ठाः ॥ ५६ ॥ अर्थ - मी कल्याणकारक पितरांना सन्मुख होऊन जाणता झालों आणि व्यापक जो यज्ञ त्याचे देवयान व पितृयान नांवाचे मार्ग मी जाणतो. तसेंच ऊर्ध्वगामी पितरांनाही जाणतों. म्हणून म्हणतों कीं, जे दर्भस्थ पितर हवनीय अन्नाबरोबर कुटलेल्या सोमाच्या रसाचे पान करितात ते या यज्ञांत येवोत. ॥५६॥ विनियोग - उपहूताः पितरः सोम्यासो बर्हिष्येषु निधिषु प्रियेषु । तऽ आ गमन्तु तऽ इह श्रुवन्त्वधि ब्रुवन्तु तेऽवन्त्वस्मान् ॥ ५७ ॥ अर्थ - दर्भांवर सांठवून ठेवलेल्या इष्ट हविर्द्रव्याकरितां बोलाविले जाणारे सोमपानार्ह अशा हे पितरांनो, तुम्ही या, आमचें वाक्य ऐका व तें ऐकल्यावर आम्हांला योग्य तें सांगा व आमचें रक्षण करा. ॥५७॥ विनियोग - आ यन्तु नः पितरः सोम्यासोऽग्निष्वात्ताः पथिभिर्देवयानैः । अस्मिन् यज्ञे स्वधया मदन्तोऽधि ब्रुवन्तु तेऽवन्त्वस्मान् ॥ ५८ ॥ अर्थ - सोमपानार्ह व श्रौतस्मार्त कर्म करणारे पितर देवमार्गांनीं येवोत व येथें येऊन अन्नानें संतुष्ट होऊन त्यांनीं आम्हांस मोठें म्हणावें आणि त्यांनीं आमचें पालन करावें. ॥५८॥ विनियोग - अग्निष्वात्ताः पितरऽ एह गच्छत सदः-सदः सदत सुप्रणीतयः । अत्ता हवीँषि प्रयतानि बर्हिष्यथा रयिँ सर्ववीरं दधातन ॥ ५९ ॥ अर्थ - ज्यांचें उत्तम प्रकारें करून स्तवन केलें आहे, अशा अग्निष्वात्त पितरांनो, या यज्ञांत या व सदोमंडपांत बसून दर्भावर विधिपूर्वक ठेवलेले हविर्द्रव्य भक्षण करा. नंतर संतुष्ट होऊन पुत्रादि सर्व समृद्धियुक्त द्रव्य आम्हांला द्या. ॥५९॥ विनियोग - येऽ अग्निष्वात्ता येऽ अनग्निष्वात्ता मध्ये दिवः स्वधया मादयन्ते । तेभ्यः स्वराडसुनीतिमेतां यथावशं तन्वं कल्पयाति ॥ ६० ॥ अर्थ - उत्तरक्रिया (और्ध्वदेहिक कर्म) यथाविधि झाली असो अगर नसो तथापि जे पितर आपल्या कर्मानें मिळविलेल्या अन्नानें स्वर्गांत सुखानें राहतात त्यांना स्वयंप्रकाशमान असा यम आपल्या इच्छेप्रमाणें चिरकाल टिकणारें मनुष्यशरीर देतो. ॥६०॥ विनियोग - अग्निष्वात्तानृतुमतो हवामहे नाराशँसे सोमपीथं यऽ आशुः । ते नो विप्रासः सुहवा भवन्तु वयं स्याम पतयो रयीणाम् ॥ ६१ ॥ अर्थ - ऋतुयुक्त अशा अग्निष्वात्त पितरांचें आम्ही आव्हान करितों. जे पितर नराशांस (पितृभक्षयुक्त) चमस पात्रांत सोमपान करिते झाले ते पितर आमच्या बोलावण्यानें शीघ्र येवोत. नंतर त्यायोगें आम्ही द्रव्याचे स्वामी होऊं. ॥६१॥ विनियोग - 'आच्या जानु' इत्यादि दहा ऋचांनीं पितरांची प्रार्थना करावी. आच्या जानु दक्षिणतो निपद्येमं यज्ञमभि गृणीत विश्वे । मा हिँसिष्ट पितरः केन चिन्नो यद्वऽ आगः पुरुषता कराम ॥ ६२ ॥ अर्थ - हे पितरांनो, तुम्ही सर्वांनीं दक्षिणाभिमुख होऊन व डावा जानुभाग (गुडघा) पालथा करून या सौत्रामणी यागाची स्तुति करावी. हे पितरांनो, कोणत्याही कारणांकरितां तुम्ही आमची हिंसा करूं नका; कारण पुरुषस्वभावाप्रमाणें चंचल चित्त होऊन आम्ही तुमचा अपराध करितों. तथापि तुम्ही मात्र आमची हिंसा करूं नये. ॥६२॥ विनियोग - आसीनासोऽ अरुणीनामुपस्थे रयिं धत्त दाशुषे मर्त्याय । पुत्रेभ्यः पितरस्तस्य वस्वः प्र यच्छत तऽ इहोर्जं दधात ॥ ६३ ॥ अर्थ - हे पितरांनो, रक्तवर्णाच्या ऊर्णासनावर बसलेल्या तुम्ही हविर्भाग देणार्या या यजमानाला द्रव्य द्यावें. हे पितरांनो, तुम्ही यजमानरूपी आपल्या पुत्रांना इष्ट असें द्रव्य द्या व आमच्या यज्ञांमध्यें यश स्थापन करा. ॥६३॥ विनियोग - यमग्ने कव्यवाहन त्वं चिन्मन्यसे रयिम् । तन्नो गीर्भिः श्रवाय्यं देवत्रा पनया युजम् ॥ ६४ ॥ अर्थ - पितृहविर्भाग धारण करणार्या हे अग्ने, तूंही जें आमचें हविर्द्रव्य (तुला चांगलें वाटतें तें देवांस समर्पण कर. तें हविर्द्रव्य) पुरोनुवाक्या व याज्या आणि वषट्कारांनीं श्रवण करण्यास योग्य आहे. ॥६४॥ विनियोग - योऽ अग्निः कव्यवाहनः पितॄन्यक्षदृतावृधः । प्रेदु हव्यानि वोचति देवेभ्यश्च पितृभ्यऽ आ ॥ ६५ ॥ अर्थ - पितृहविर्द्रव्य धारण करणारा जो अग्नि सत्य वाढविणार्या पितरांचा याग करिता झाला तो आतां देवांना व पितरांना आमची हविर्द्रव्यें सांगो म्हणजे देवांकडे व पितरांकडे जाऊन हीं तुमचीं हविर्द्रव्यें आहेत असें कथन करो. ॥६५॥ विनियोग - त्वमग्नऽ ईडितः कव्यवाहनावाड्ढव्यानि सुरभीणि कृत्वी । प्रादाः पितृभ्यः स्वधया तेऽ अक्षन्नद्धि त्वं देव प्रयता हवीँषि ॥ ६६ ॥ अर्थ - पितृहविर्द्रव्य धारण करणार्या हे अग्ने, देव ऋत्विजांकडून स्तुति केला गेलेला तूं हविर्द्रव्यांना वहन केलेंस व स्वधारूपी पितृमंत्रानें पितरांकडे नेलेंस त्या पितरांनीं तें हविर्द्रव्य भक्षण केलें. हे अग्ने, तूंही शुद्ध अशी तीं हविर्द्रव्यें भक्षण कर. ॥६६॥ विनियोग - ये चेह पितरो ये च नेह याँश्च विद्म याँ २ऽ उ च न प्रविद्म । त्वं वेत्थ यति ते जातवेदः स्वधाभिर्यज्ञँ सुकृतं जुषस्व ॥ ६७ ॥ अर्थ - जे पितर या लोकांत आहेत व जे या लोकांत नाहीत तसेंच जे पितर आम्हांस माहीत आहेत व नाहींत ते सर्व किती आहेत ते हे अग्ने, तुला माहीत आहे. तूं पितरांच्या स्वधारूपी अन्नानें केलेल्या यज्ञाचें सेवन कर. ॥६७॥ विनियोग - इदं पितृभ्यो नमोऽ अस्त्वद्य ये पूर्वासो यऽ उपरासऽ ईयुः । ये पार्थिवे रजस्या निषत्ता ये वा नूनँ सुवृजनासु विक्षु ॥ ६८ ॥ अर्थ - जे पूर्वीचे पितर स्वर्गांत गेले व कृतकृत्य होऊन जे पितर मोक्षास गेले व जे पृथ्वीवरील अग्नींत स्थित झालेले, तसेंच धर्मबलानें युक्त अशा यजमानरूप प्रजेचे ठायीं जे स्थित झाले अशा चारही प्रकारच्या पितरांना हें अन्न असो. ॥६८॥ विनियोग - अधा यथा नः पितरः परासः प्रत्नासोऽ अग्नऽ ऋतमाशुषाणाः । शुचीदयन्दीधितिमुक्थशासः क्षामा भिन्दन्तोऽ अरुणीरप व्रन् ॥ ६९॥ अर्थ - हे अग्ने, जे आमचे उत्कृष्ट, प्राचीन व यज्ञाला प्राप्त करणारे पितर मरणानंतर ज्याप्रकारें करून देवयान मार्गानें निर्मळ अशा रविमंडळाला प्राप्त झाले, त्याप्रमाणें यज्ञांतील शस्त्र म्हणणारे वेदी, चात्वाल इत्यादिकांच्या योगानें भूमीचें विदारण करणारे म्हणजे यज्ञ करणारे आम्हीही रक्तवर्णाच्या सूर्यकिरणांना व्याप्त करूं म्हणजे देवयानमार्गाला प्राप्त होऊं. ॥६९॥ विनियोग - उशन्तस्त्वा नि धीमह्युशन्तः समिधीमहि । उशन्नुशतऽ आवह पितॄन्हविषेऽ अत्तवे ॥ ७० ॥ अर्थ - हे अग्ने, कामना करणारे आम्ही तुझी स्थापना करितों व तुला प्रदीप्त करितों व हे कामना असलेल्या अग्ने, तूं आमच्या पितरांना भक्षण करण्याकरितां हविर्द्रव्य आण. ॥७०॥ विनियोग - अपां फेनेन नमुचेः शिरऽ इन्द्रोदवर्तयः । विश्वा यदजय स्पृधः ॥ ७१ ॥ अर्थ - हे इंद्रा, ज्यावेळीं तूं सर्व संग्रामांना जिंकलेंस त्यावेळी तूं जलाच्या फेंसानें नमुचिराक्षसाचें मस्तक तोडलेंस. ॥७१॥ विनियोग - 'सोमो राजा' इत्यादि आठ मंत्रांनीं अध्वर्यूनें एकदमच पयोग्रह व सुराग्रहांचें उपस्थान करावें. सोमो राजामृतँ सुतऽ ऋजीषेणाजहान्मृत्युम् । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७२ ॥ अर्थ - सोम राजा कांडला गेला म्हणजे अमृतस्वरूपी रस बनतो. कारण नीरस अशा सोमलताचूर्णानें तो स्थूलभावरूपी मृत्यूला टाकतो. या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध, वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७२॥ विनियोग - अद्भ्यः क्षीरं व्यपिबत् क्रुङ्~घाङ्गिरसो धिया । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु॥ ७३ ॥ अर्थ - अंगाचा रस जो प्राण तो हंसाप्रमाणें बुद्धीनें जलांतून, दुग्धाचें पान करितो. (दूध व पाणी एकत्र केलें असता त्यांतील दूधच तेवढे हंस घेतो.) या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध, वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारे व मधुर असें आहे. ॥७३॥ विनियोग - सोममद्भ्यो व्यपिबच्छन्दसा हँसः शुचिशत् । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु॥ ७४ ॥ अर्थ - निर्मल गगनांमध्यें राहणारा आदित्य जलांतून वेदरूप किरणांनीं ज्याप्रमाणें सोमाचें पान करितो त्या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७४॥ विनियोग - अन्नात्परिस्रुतो रसं ब्रह्मणा व्यपिबत् क्षत्रं पयः सोमं प्रजापतिः । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७५ ॥ अर्थ - प्रजापति सुरारूपी अन्नांतून गायत्रीमंत्रानें रस वेगळा करून प्राशन करिता झाला व त्यानें क्षत्रियाला वश केलें व त्यानें दुग्धाचें व सोमाचें प्राशन केलें. या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७५॥ विनियोग - रेतो मूत्रं वि जहाति योनिं प्रविशदिन्द्रियम् । गर्भो जरायुणावृतऽ उल्बं जहाति जन्मना । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७६ ॥ अर्थ - पुरुषाचें शिश्न योनींत प्रविष्ट झाल्यावर वीर्याचाच त्याग करितें व इतर वेळीं मूत्राचा त्याग करितें. गर्भवेष्टनानें वेष्टिलेला गर्भ जन्माचे वेळीं त्या गर्भवेष्टनाला टाकितो. मध्यंतरी टाकीत नाही. (पहिल्या उदाहरणांत द्वार एक असून स्थानें भिन्न झाल्यानें क्रिया भिन्न होतात हें सांगितलें. स्थान एक असून द्वारें भिन्न असण्यानें क्रिया भिन्न होतात हें दुसर्या उदाहरणांत सांगितलें.) या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७६॥ विनियोग - दृष्ट्वा रूपे व्याकरोत्सत्यानृते प्रजापतिः । अश्रद्धामनृतेऽदधाच्छ्रद्धाँ सत्ये प्रजापतिः । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७७ ॥ अर्थ - प्रजापतीनें मूर्तिमान् अशा सत्य व अनृतांचें पृथक्करण केलें. अनृतामध्यें अश्रद्धा व सत्यामध्यें श्रद्धा स्थापन केली. या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७७॥ विनियोग - वेदेन रूपे व्यपिवत्सुतासुतौ प्रजापतिः । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७८ ॥ अर्थ - प्रजापतीनें सुत म्हणजे सोम, असुत म्हणजे दुग्ध यांच्या रूपांचे ज्ञान करून घेऊन विभागपूर्वक प्राशन केलें. या सत्यानें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७८॥ विनियोग - दृष्ट्वा परिस्रुतो रसं शुक्रेण शुक्रं व्यपिबत्पयः सोमं प्रजापतिः । ऋतेन सत्यमिन्द्रियं विपानँ शुक्रमन्धसऽ इन्द्रस्येन्द्रियमिदं पयोऽमृतं मधु ॥ ७९ ॥ अर्थ - प्रजापतीनें सुरेचा रस पाहून शुद्ध अशा मंत्रानें दुग्ध व सोमाला शुद्ध करून त्याचें विभागपूर्वक प्राशन केलें. या सत्यानें हें सत्य जाणलें गेलें. सोमाचें अशा रीतीनें विभागपूर्वक केलेलें प्राशन शुद्ध असतें म्हणून तें वीर्यप्रद होवो. तसेंच इंद्राचें दुग्ध वीर्ययुक्त आणि अजरामरत्व देणारें व मधुर असें आहे. ॥७९॥ विनियोग - 'सीसेन तंत्रं' इत्यादि सोळा मंत्रांनीं प्रत्येक मंत्रानें दोन, अशा बत्तीस सुराग्रहांचा होम करावा. सीसेन तन्त्रं मनसा मनीषिणऽ ऊर्णासूत्रेण कवयो वयन्ति । अश्विना यज्ञँ सविता सरस्वतीन्द्रस्य रूपं वरुणो भिषज्यन् ॥ ८० ॥ अर्थ - ज्याप्रमाणें एखादा कारागीर शिशाच्या तारेंनें बहुभूषण ओवतो व ऊर्णासूत्रानें पट विणतो त्याप्रमाणें अश्विनीकुमार, सविता, सरस्वती आणि वरुण हे शिशाच्या सूत्रानें आणि ऊर्णासूत्रानें यज्ञ संपादन करितात. ते अश्विनीकुमारादि देव मेधावी भूत वस्तुद्रष्टे व इंद्राच्या रूपाला औषध देऊन बरे करणारे असे आहेत. ॥८०॥ विनियोग - तदस्य रूपममृतँ शचीभिस्तिस्रो दधुर्देवताः सँरराणाः । लोमानि शष्पैर्बहुधा न तोक्मभिस्त्वगस्य माँसमभवन्न लाजाः ॥ ८१ ॥ अर्थ - दोन अश्विनीकुमार व सरस्वती या तीन देवतांनीं उत्तम तर्हेनें रममाण होऊन म्हणजे सहज लीलेनें या इंद्राचे अविनाशी रूप पुढील कर्मांगांनीं संयुक्त केलें तें असें - इंद्राचे लोम उगवलेल्या गवतांनीं जोडले व त्याची त्वचा वाढलेल्या जवांनीं संयुक्त केली व साळीच्या लाह्या याचें मांस बनले. ॥८१॥ विनियोग - तदश्विना भिषजा रुद्रवर्तनी सरस्वती वयति पेशोऽ अन्तरम् । अस्थि मज्जानं मासरैः कारोतरेण दधतो गवां त्वचि ॥ ८२ ॥ अर्थ - रुद्राप्रमाणें ज्यांचा मार्ग आहे असे वैद्य अश्विनीकुमार आणि सरस्वती यांनीं इंद्राचें अंतर्वर्ती रूप पुढील वस्तूंनीं संबद्ध केलें. शष्पादि चूर्णाच्या चरूंतून गळणार्या जलांनीं इंद्राचीं हाडें युक्त केलीं. सुरा गाळण्याचे चाळणीनें याची मज्जा निर्माण केली. ते अश्विनीकुमार व सरस्वती गाईच्या चर्मावर सुरा स्थापन करणारे असे आहेत. ॥८२॥ विनियोग - सरस्वति मनसा पेशलं वसु नासत्याभ्यां वयति दर्शतं वपुः । रसं परिस्रुता न रोहितं नग्नहुर्धीरस्तसरं न वेम ॥ ८३ ॥ अर्थ - अश्विनीकुमारासहवर्तमान सरस्वती इंद्राचें हिरण्ययुक्त द्रव्य व सुंदर रूप वस्त्राप्रमाणें विणते, व इंद्राचें शरीर रंगविण्याकरितां सुरेचा लोहित रस त्यास लावते. या विणण्याचे वेळीं मादक सुराकंद विणण्याचें साधन असा, दंड व धोटा होतो. ॥८३॥ विनियोग - पयसा शुक्रममृतं जनित्रँ सुरया मूत्राज्जनयन्त रेतः । अपामतिं दुर्मतिं बाधमानाऽ ऊवध्यं वातं सव्वं तदारात् ॥ ८४ ॥ अर्थ - अश्विनीकुमार व सरस्वती इंद्राचें वीर्य दुग्धानें निर्माण करिते झाले. तें वीर्य शुद्ध, अविनाशी व उत्पादक असें आहे. तसेंच त्यांनीं जवळ राहून आमाशयांतील अन्न व पक्वाशयांतील अन्न सुरेनें निर्माण केलें व मूत्रापासून मूत्र निर्माण केलें. ते अश्विनीकुमार आणि सरस्वती वध्यपणा व दुर्बुद्धीला बाधित करून सद्बुद्धि देणारे आहेत. ॥८४॥ विनियोग - इन्द्रः सुत्रामा हृदयेन सत्यं पुरोडाशेन सविता जजान । यकृत् क्लोमानं वरुणो भिषज्यन् मतस्ने वायव्यैर्न मिनाति पित्तम् ॥ ८५ ॥ अर्थ - चांगलें संरक्षण करणारा पुरोडाशदेवतारूपी जो इंद्र तो या रोगी इंद्राचें हृदय उत्पन्न करितो. व सविता पुरोडाशानें इंद्राचें सत्य निर्माण करितो. तसेंच इंद्राची चिकित्सा करणारा वरुण यकृत आणि क्लोम म्हणजे गलनाडिका उत्पन्न करितो. वायव्य संज्ञक ऊर्ध्व अशा पात्रांनीं त्याच्या हृदयाच्या दोन्ही बाजूंच्या अस्थि आणि पित्त निर्माण करितो. ॥८५॥ विनियोग - आन्त्राणि स्थालीर्मधु पिन्वमाना गुदाः पात्राणि सुदुधा न धेनुः । श्येनस्य पत्रं न प्लीहा शचीभिरासन्दी नाभिरुदरं न माता ॥ ८६ ॥ अर्थ - मध सिंचन करणार्या स्थाली अंत्रें म्हणजे आंतडें बनल्या. पात्रें गुदस्थानें व उत्तम दोहनशील धेनू गुदरूपी बनली. श्येनाचा पंख प्लीहा झाला व सोमाच्या मातेसारखा असलेला चौरंग कर्मांच्या योगानें नाभी व उदर बनला. ॥८६॥ विनियोग - कुम्भो वनिष्ठुर्जनिता शचीभिर्यस्मिन्नग्रे योन्यां गर्भोऽ अन्तः । प्लाशिर्व्यक्तः शतधारऽ उत्सो दुहे न कुम्भी स्वधां पितृभ्यः ॥ ८७ ॥ अर्थ - सुराकुंभ कर्मांच्या योगानें स्थूल आंतडें बनला. ज्या सुराकुंभरूपी स्थानांत पूर्वी सुरारूपी गर्भ राहिला होता, तो शतधारायुक्त कूपासारखा स्पष्ट असणारा कुंभ शिश्न बनला व सुराकुंभी पितरांकरितां अन्न पूर्ण करिते म्हणजे पितरांना अन्न देणारी बनली. ॥८७॥ विनियोग - मुखं सदस्य शिरऽ इत् सतेन जिह्वा पवित्रमश्विनासन्त्सरस्वती । चप्यं न पायुर्भिषगस्य वालो वस्तिर्न शेषो हरसा तरस्वी ॥ ८८ ॥ अर्थ - सुत नांवाचें पात्र या इंद्राचें मुख बनलें व त्या पात्रानें याचें शिर निर्माण झालें. पवित्र जिव्हा बनलें व अश्विनीकुमार आणि सरस्वती हे देव याच्या मुखांत राहते झाले. चप्य पायु इंद्रिय झालें व सुरा गाळण्याचें वस्त्र या इंद्राचा वैद्य, गुदस्थान व वीर्यानें वेगवान् असें लिंग या तीन वस्तु बनल्या. ॥८८॥ विनियोग - अश्विभ्यां चक्षुरमृतं ग्रहाभ्यां छागेन तेजो हविषा शृतेन । पक्ष्माणि गोधूमैः कुवलैरुतानि पेशो न शुक्रमसितं वसाते ॥ ८९ ॥ अर्थ - आश्विनपात्रांनीं याचें अविनाशी चक्षुरिंद्रिय केलें जातें व छागरूपी पक्व हविर्द्रव्यानें नेत्र तेज, गोधूमांनीं नेत्रलोमें केलीं जातात व तीं लोमें बदरांनीं नेत्राशीं जोडलीं जातात. व नेत्रांतील शुक्ल व कृष्ण रूपेंहि अश्विनीकुमाराकडून केलीं जातात. ॥८९॥ विनियोग - अविर्न मेषो नसि वीर्याय प्राणस्य पन्थाऽ अमृतो ग्रहाभ्याम् । सरस्वत्युपवाकैर्व्यानं नस्यानि बहिर्बदरैर्जजान ॥ ९० ॥ अर्थ - बकरी व मेंढा यांनीं इंद्राच्या नासिकेंतील वीर्य निर्माण केलें जातें व सारस्वत गृहांनीं (पात्रांनीं) प्राणवायूचा अविनाशी मार्ग केला जातो. सरस्वती यवांकुरांनीं इंद्राचा व्यान वायु निर्माण करिते व दर्भ आणि बोरांनीं त्याचे नासिकेंतील केश निर्माण केले जातात. ॥९०॥ विनियोग - इन्द्रस्य रूपमृषभो बलाय कर्णाभ्याँ श्रोत्रममृतं ग्रहाभ्याम् । यवा न बर्हिर्भ्रुवि केसराणि कर्कन्धु जज्ञे मधु सारधं मुखात् ॥ ९१ ॥ अर्थ - ऋषभ सामर्थ्याकरितां इंद्राचें रूप करिता झाला. व ऐंद्रपात्रांनीं शब्दग्राही श्रोत्रेंद्रिय कर्णाचे ठिकाणीं स्थापन केलें. यव व बर्हि (कुश) भृकुटींचे केश बनले. बोर व मध हें मुखांतील लाळ बनले. ॥९१॥ विनियोग - आत्मन्नुपस्थे न वृकस्य लोम मुखे श्मश्रूणि न व्याघ्रलोम । केशा नशीर्षन्यशसे श्रियै शिखा सिँहस्य लोम त्विषिरिन्द्रियाणि ॥ ९२ ॥ अर्थ - शरीरावर उपस्थ भागांत (गुह्येंद्रियावर) जे केश आहेत ते वृक लोमापासून बनले. व्याघ्रलोमापासून मुखावरील केश झाले. तसेंच मस्तकावरील कीर्तीकरितां असलेले जे केश व शोभेकरितां असलेली जी शिखा त्यांची कांति व इतर सर्व इंद्रियें सिंहाच्या लोमांपासून उत्पन्न झालीं. ॥९२॥ विनियोग - अङ्गान्यात्मन् भिषजा तदश्विनात्मानमङ्गैः समधात् सरस्वती । इन्द्रस्य रूपँ शतमानमायुश्चन्द्रेण ज्योतिरमृतं दधानाः ॥ ९३ ॥ अर्थ - अश्विनीकुमारांनीं शरीरावयव निर्माण केले व सरस्वतीनें त्यांचें शरीरावर स्थापन केलें. ते अश्विनीकुमार आणि सरस्वती इंद्राचें जगत् पूज्य रूप व आयुष्य आल्हादक तेजासह अविनाशी करणारें आहे. ॥९३॥ विनियोग - सरस्वती योन्यां गर्भमन्तरश्विभ्यां पत्नी सुकृतं बिभर्ति । अपाँ रसेन वरुणो न साम्नेन्द्रँ श्रियै जनयन्नप्सु राजा ॥ ९४ ॥ अर्थ - सरस्वती अश्विनीकुमारांची पत्नी होऊन आपल्या योनींत सुविहीत असा गर्भ धारण करते. व जलांचा राजा वरुण उदकरसभूत सामवेदाच्या योगानें इंद्राला लक्ष्मीकरितां उत्पन्न करितो व त्याचें पोषण करितो. ॥९४॥ विनियोग - तेजः पशूनाँ हविरिन्द्रयावत् परिस्रुता पयसा सारघं मधु । अश्विभ्यां दुग्धं भिषजा सरस्वत्या सुतासुताभ्याममृतः सोमऽ इन्दुः ॥ ९५ ॥ अर्थ - वैद्य अश्विनीकुमारांनीं व सरस्वतीनें वीर्ययुक्त पशुसंबंधीं हविर्द्रव्य सुरा, दुग्ध व मध घेऊन इंद्राकरितां तेजोरूपी सौम्यमणी संज्ञक दुग्ध उत्पन्न केलें व सुरा आणि दुग्धापासून व अविनाशी आणि ऐश्वर्यप्रद असा सोम निर्माण केला. ॥९५॥ ॥ एकोनविंशोऽध्यायः ॥ |