शुक्ल यजुर्वेद
अष्टादशोऽध्यायः



विनियोग - (सतराव्या अध्यायांत चित्यारोहणाचे मंत्र सांगितले. अठराव्या अध्यायांत वसोर्धारेसंबंधीं मंत्र सांगतात.) नंतर यजमानानें आज्यसंस्कार करून मोठया स्रुव्यानें तें संस्कृत घृत पांच वेळां उंबराच्या मोठया स्रुचेमध्यें घेऊन त्या घृताची अग्नीवर सारखी धार लावावी. घृत अग्नीशीं संयुक्त झाल्यावर 'वाजश्च' पासून 'वेट्‌स्वाहा' पर्यंत एकोणतीस मंत्र म्हणावे.


वाजश्च मेप्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रवश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्चमे स्वश्च मे यज्ञेन कपन्ताम् ॥ १ ॥


अर्थ - मीं केलेल्या यज्ञानें वाजादि पदार्थ मला प्राप्त होवोत. १. अन्न २. अन्नदानाची आज्ञा ३. शुद्धि ४. अन्नविषयक उत्कण्ठा ५. ध्यान ६. संकल्प ७. उत्तम शब्द ८. स्तुति ९. वेदमंत्र १०. ब्राह्मणग्रंथ ११. प्रकाश १२. स्वर्ग. ॥१॥





विनियोग -


प्राणश्च मेऽपानश्च मे व्यानश्च मेऽसुश्च मे चित्तं च मऽ आधीतं च मे वाक् च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २ ॥


अर्थ - १३. ऊर्ध्वगामी वायु १४. अधोगामी वायु १५. सर्वशरीरसंचारी वायु १६. प्रवृतिमान् वायु १७. मानससंकल्प १८. बाह्यविषयज्ञान १९. वागिन्द्रिय २०. मन २१. चक्षु २२. श्रवणेंद्रिय २३. ज्ञानेन्द्रियकौशल्य २४. कर्मेंद्रियकौशल्य. ॥२॥





विनियोग -


ओजश्च मे सहश्च मऽ आत्मा च मे तनुश्चमे शर्म च मे वर्म च मेऽङ्‍गानि च मेऽस्थीनि च मे परूँषि च मे शरीराणि च मऽ आयुश्च मे जरा च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ३ ॥


अर्थ - २५. बलाचें कारण तेंच २६. शारीरबल २७. परमात्मा २८. सुंदर शरीर २९. सुख ३०. कवच ३१. हस्तादि अवयव ३२. अस्थि (हाडें) ३३. बोटाचीं पेरें ३४. सामान्य शरीरावयव ३५. जीवन ३६. म्हातारपण. ॥३॥





विनियोग -


ज्यैष्ठ्यं च मऽ आधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मेऽ मश्च मे ऽ म्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्षिमा च मे द्राघिमा च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ४ ॥


अर्थ - ३७. प्रशस्तपणा ३८. स्वामित्व ३९. मनांतील कोप ४०. शरीरावर दिसणारा कोप ४१. अपरिमितपणा ४२. थंड व गोड पाणी ४३. जयसामर्थ्य ४४. धनाचा मोठेपणा ४५. संततीचें विशालत्व ४६. गृहादिविस्तार ४७. दीर्घ जीवित ४८. अविच्छिन्न संतति ४९. अन्नद्रव्यादिकांचें बाहुल्य ५०. विद्यादिकांचा उत्कर्ष. ॥४॥





विनियोग -


सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे विश्वं च मे महश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ५ ॥


अर्थ - ५१. खरे बोलणे ५२. परलोकविश्वास ५३. जंगम वस्तु ५४. सुवर्णादि द्रव्य ५५. स्थावर वस्तु ५६. दीप्ति ५७. घृतादि क्रीडा ५८. त्यांपासून होणारा आनंद ५९. पूर्वी झालेली संतति ६०. पुढें होणारी संतति ६१. ऋक्समूह ६२. त्याच्या पठणाचें पुण्य. ॥५॥





विनियोग -


ऋतं च मेऽमृतं च मे ऽयक्ष्मं च मेऽनामयच्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मेऽनमित्रं च मे ऽभयं च मे सुखं च मे शयनं च मे सूषाश्च मे सुदिनं च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ६ ॥


अर्थ - ६३. यज्ञादि कर्म ६४. त्याचें स्वर्गादि फल ६५. क्षयादि महारोगांचा अभाव ६६. सामान्य रोगांचा अभाव ६७. व्याधिनाशक औषधि ६८. दीर्घायुष्य ६९. शत्रूंचा अभाव ७०. अभय ७१. आनन्द ७२. उत्तम शय्या ७३. उत्तम प्रातःकाल ७४. चांगला दिवस. ॥६॥





विनियोग -


यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे संविच्च मे ज्ञात्रं च मे सूश्च मे प्रसूश्च मे सीरं च मे लयश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ७॥


अर्थ - ७५. अश्वादिकांचा नियामक ७६. पोषण करणारा ७७. असलेलें द्रव्य रक्षण करण्याचें सामर्थ्य ७८. धैर्य ७९. सर्वानुकूलता ८०. आदर ८१. वेदशास्त्रादि ज्ञान ८२. विज्ञान सामर्थ्य ८३. पुत्रप्रेरण सामर्थ्य ८४. पुत्रजनन सामर्थ्य ८५. नांगरादि सहाय्यानें उत्पन्न होणारें धान्य ८६. शेतीला होणार्‍या प्रतिबन्धाची निवृत्ति. ॥७॥





विनियोग -


शं च मे मयश्च मे प्रियं च मे ऽनुकामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भगश्च मे द्रविणं च मे भद्रं चे मे श्रेयश्च मे वसीयश्च मे यशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ८ ॥


अर्थ - ८७. ऐहिक सुख ८८. पारलौकिक सुख ८९. प्रिय वस्तु ९०. अनुकूल यत्‍नसाध्य पदार्थ ९१. विषयजन्य सुख ९२. मनाची प्रसन्नता करणारा बन्धुवर्ग ९३. सौभाग्य ९४. द्रव्य ९५. कल्याण ९६. श्रेय ९७. निवासयोग्य गृहादि ९८. कीर्ति. ॥८॥





विनियोग -


ऊर्क् च मे सूनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च म ऽऔद्‍भिद्यं च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ९ ॥


अर्थ - ९९. अन्न १००. सत्य व प्रिय वाणी १०१. दुग्ध १०२. त्यांतील सार १०३. घृत १०४. मध १०५. बन्धूंसह भोजन १०६. बन्धूंसह पान १०७. धान्योत्पत्ति १०८. वृष्टि १०९. जयसामर्थ्य ११०. आम्रादि वृक्षांची उत्पत्ति. ॥९॥





विनियोग -


रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे कुयवं च मे ऽक्षितं च मे ऽन्नं च मे ऽक्षुच्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १० ॥


अर्थ - १११. सुवर्ण ११२. मुक्तादिमणि ११३. धनवृद्धि ११४. शरीरवृद्धि ११५. व्याप्तिसामर्थ्य ११६. ऐश्वर्य ११७. धनपुत्रादि बाहुल्य ११८. गजतुरगादि बाहुल्य ११९. कडधान्य १२०. उत्तम धान्य १२१. अन्न १२२. अन्नाचा परिपाक ॥१०॥





विनियोग -


वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथ्यं च म ऽऋद्धं च मऽ ऋद्धिश्च मे क्लृप्तं च मे क्लृप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ ११ ॥


अर्थ - १२३. पूर्वी मिळालेलें द्रव्य १२४. पुढें मिळणारें द्रव्य १२५. पूर्वीच असलेलें शेत १२६. त्यांत पुढें येणारें धान्य १२७. सहज जाण्यासारखा प्रदेश १२८. चांगल्या हितकर वस्तु १२९. यज्ञफल १३०. यज्ञफलसमृद्धि १३१. कार्ययोग्य द्रव्य १३२. कार्यसामर्थ्य १३३. सामान्य पदार्थांचा निश्चय १३४. दुर्घटकार्यांविषयीं निश्चय. ॥११॥





विनियोग -


व्रीहयश्च मे यवाश्च मे माषाश्च मे तिलाश्च मे मुद्‍गाश्च मे खल्वाश्च मे प्रियङ्‍गवश्च मे ऽणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे गोधूमाश्च मे मसूराश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १२ ॥


अर्थ - १३५. व्रीहि (तांदूळ) १३६. जव १३७. उडीद १३८. तीळ १३९. मूग १४०. चणे १४१. कांगणी १४२. अणु १४३. सावे १४४. रानांतील तृणधान्यें १४५. गहूं १४६. मसूर. ॥१२॥





विनियोग -


अश्मा च मे मृत्तिका च मे गिरयश्च मे पर्वताश्च मे सिकताश्च मे वनस्पतयश्च मे हिरण्यं च मे ऽयशश्च मे श्यामं च मे लोहं च सीसं च मे त्रपु च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १३ ॥


अर्थ - १४७. दगड १४८. उत्तम माती १४९. लहान पर्वत १५०. मोठे पर्वत १५१. वाळू १५२. झाडें १५३. सोनें व ??? १५४. पोलाद १५५. लोखंड १५६. शिसें १५७. कथील. ॥१३॥





विनियोग -


अग्निश्च मऽ आपश्च मे वीरुधश्च मऽ ओषधयश्च मे कृष्टपच्याश्च मे ऽकृष्टपच्याश्च मे ग्राम्याश्च मे पशवऽ आरण्याश्च मे वित्तं च मे वित्तिश्च मे भूतं च मे भूतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १४ ॥


अर्थ - १५८. अग्नि १५९. जलें १६०. लतावेली १६१. औषधी १६२. जमीन नांगरून पिकणारीं धान्यें १६३. जमीन न नांगरता पिकणारीं धान्यें १६४. न पेरतां उत्पन्न होणारीं धान्यें १६५. ग्राम्य पशु १६६. रानटी पशु १६७. पूर्वप्राप्त द्रव्य १६८. पुढें प्राप्त होणारें द्रव्य १६९. पूर्वोत्पन्न पुत्र १७०. स्वोपार्जित ऐश्वर्य. ॥१४॥





विनियोग -


वसु च मे वसतिश्च मे कर्म च मे शक्तिश्च मे ऽर्थश्च मऽ एमश्च मऽ इत्या च मे गतिश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १५ ॥


अर्थ - १७१. द्रव्य १७२. गृह १७३. अग्निहोत्रादि कर्म १७४. कर्मानुष्ठान सामर्थ्य १७५. इष्ट पदार्थ १७६. प्राप्तव्य पदार्थ १७७. इष्टप्राप्त्युपाय १७८. इष्टप्राप्ति. ॥१५॥





विनियोग - यापुढें तीन मंत्रांत ज्या आहुति आहेत त्यांतील अर्धभागाचा स्वामी इंद्र आहे व अर्ध्या भागाच्या अग्नि वगैरे आहेत म्हणून इंद्रदेवतेचें पठण प्रत्येक देवतेबरोबर केलें आहे.


अग्निश्च मऽ इन्द्रश्च मे सोमश्च मऽ इन्द्रश्च मे सविता च मऽ इन्द्रश्च मे सरस्वती च मऽ इन्द्रश्च मे पूषा च मऽ इन्द्रश्च मे बृहस्पतिश्च मऽ इन्द्रश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १६ ॥


अर्थ - १७९. अग्नि व इंद्र १८०. सोम व इंद्र १८१. सविता व इंद्र १८२. सरस्वती व इंद्र १८३. पूषा व इंद्र १८४. बृहस्पति व इंद्र. ॥१६॥





विनियोग -


मित्रश्च मऽ इन्द्रश्च मे वरुणश्च मऽ इन्द्रश्च मे धाता च मऽ इन्द्रश्च मे त्वष्टा च मऽ इन्द्रश्च मे मरुतश्च मऽ इन्द्रश्च मे विश्वे च मे देवाऽ इन्द्रश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १७ ॥


अर्थ - १८५. मित्र व इंद्र १८६. वारुण व इंद्र १८७. धाता व इंद्र १८८. त्वष्ठा व इंद्र १८९. मरुत् व इंद्र १९०. विश्वेदेव व इंद्र. ॥१७॥





विनियोग -


पृथिवी च मऽ इन्द्रश्च मे ऽन्तरिक्षं च म ऽइन्द्रश्च मे द्यौश्च मऽ इन्द्रश्च मे समाश्च मऽ इन्द्रश्च मे नक्षत्राणि च मऽ इन्द्रश्च मे दिशश्च मऽ इन्द्रश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १८ ॥


अर्थ - १९१. पृथ्वी व इंद्र १९२. अन्तरिक्ष व इंद्र १९३. द्युलोक व इंद्र १९४. वर्षाधिष्ठात्री देवता व इंद्र १९५. नक्षत्रें व इंद्र १९६. पूर्वदिशा व इंद्र. ॥१८॥





विनियोग - यापुढील तीन मंत्रांनीं ग्रहपात्रांचा होम आहे.


अँशुश्च मे रश्मिश्च मे ऽदाभ्यश्च मे ऽधिपतिश्च मऽ उपाँशुश्च मेऽन्तर्यामश्च मऽ ऐन्द्रवायवश्च मे मैत्रावरुणश्च मऽ आश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ १९ ॥


अर्थ - १९७. अंशु १९८. रश्मि १९९. अदाभ्य २००. अधिपति २०१. उपांशु २०२. अन्तर्याम २०३. ऐन्द्रवायव २०४. मैत्रावरुण २०५. आश्विन २०६. प्रतिप्रस्थान २०७. शुक्र २०८. मन्थी ॥१९॥





विनियोग -


आग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मऽ ऐन्द्राग्नयश्च मे महावैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे निष्केवल्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २० ॥


अर्थ - २०९. आग्रयण २१०. वैश्वदेव २११. ध्रुव २१२. वैश्वानर २१३. ऐन्द्राग्न २१४. महावैश्वदेव २१५. मरुत्वतीय २१६. निष्केवल्य २१७. सावित्र २१८. सारस्वत २१९. पात्‍नीवत २२०. हारियोजन. ॥२०॥





विनियोग -


स्रुचश्च मे चमसाश्च मे वायव्यानि च मे द्रोणकलशश्च मे ग्रावाणश्च मेऽधिषवणे च मे पूतभृच्च मऽ आधवनीयश्च मे वेदिश्च मे बर्हिश्च मे ऽवभृथश्च मे स्वगाकारश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २१ ॥


अर्थ - २२१. स्रुचा २२२. चमस २२३. वायव्य पात्रें २२४. द्रोणकलश २२५. ग्रावन् २२६. अधिषवण २२७. पूतभृत् २२८. अधिषवण काष्ठफलकें २२९. आधवनीय २३०. वेदि २३१. बर्हि २३२. अवभृथ २३३. शम्युवाक. ॥२१॥





विनियोग - यानंतर दोन मंत्रांनीं यज्ञक्रतूंचा होम आहे.


अग्निश्च मे घर्मश्च मे ऽर्कश्च मे सूर्यश्च मे प्राणश्च मे ऽश्वमेधश्च मे पृथिवी च मे ऽदितिश्च मे दितिश्च मे द्यौश्च मे ऽङ्‍गुलयः शक्वरयो दिशश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २२ ॥


अर्थ - २३४. अग्निष्टोम २३५. प्रवर्ग्य २३६. अर्कयाग २३७. सूर्ययाग २३८. गवामयन २३९. अश्वमेध २४०. पृथिवी २४१. अदिति २४२. द्युलोक २४३. विराट् पुरुषाच्या अंगुलि २४४. त्याच्या शक्ति २४५. पूर्वादि दिशा. ॥२२॥





विनियोग -


व्रतं च म ऽऋतवश्च मे तपश्च मे संवत्सरश्च मे ऽहोरात्रेऽ ऊर्वष्ठीवे बृहद्रथन्तरे च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २३ ॥


अर्थ - २४६. व्रतनियम २४७. वसंतादि ऋतु २४८. कृच्छ्रचांद्रायणादि तप २४९. प्रभवादि संवत्सरें २५०. दिवस २५१. दिवस व रात्रि २५२. मांडया २५३. गुडघे २५४. बृहत्साम २५५. रथन्तरसाम. ॥२३॥





विनियोग - 'एका च मे' या मंत्रानें अयुग्म (विषमसंख्याक) स्तोमांचा यज्ञ आहे. येथें व पुढील मंत्रांत आदरार्थ द्विरुक्ती आहे.


एका च मे तिस्रश्च मे तिस्रश्च मे पञ्च च मे पञ्च च मे सप्त च मे सप्त च मे नव च मे नव च मऽ एकादश च मऽ एकादश च मे त्रयोदश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे सप्तदश च मे नवदश च मे नवदश च मऽ एकविँशतिश्च मऽ एकविँशतिश्च मे त्रयोविँशतिश्च मे त्रयोविँशतिश्च मे पञ्चविँशतिश्च मे पञ्चविँशतिश्च मे सप्तविँशतिश्च मे सप्तविँशतिश्च मे नवविँशतिश्च मे नवविँशतिश्च मऽ एकत्रिँशच्च मऽ एकत्रिँशच्च मे त्रयस्त्रिँशच्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २४ ॥


अर्थ - २५६. एक २५७. तीन २५८. पांच २५९. सात २६०. नऊ २६१. अकरा २६२. तेरा २६३. पंधरा २६४. सतरा २६५. एकोणीस २६६. एकवीस २६७. तेवीस २६८. पंचवीस २६९. सत्तावीस २७०. एकोणतीस २७१. एकतीस २७२. तेहतीस. ॥२४॥





विनियोग - 'चतस्रश्च मे' या मंत्रानें युग्मस्तोमाचा होम आहे.


चतस्रश्च मेऽष्टौ च मे मेऽष्टौ च मे द्वादश च मे द्वादशच मे षोडश च मे षोडश च मे विँशतिश्च मे विँशतिश्च मे चतुर्विँशतिश्च मे चतुर्विँशतिश्च मेऽष्टाविँशतिश्च मेऽष्टाविँशतिश्च मे द्वात्रिँशच्च मे द्वात्रिँशच्च मे षट्‍त्रिँशच्च मे षट्‍त्रिङ्‍शच्च मे चत्वारिँशच्च मे चत्वारिँशच्च मे चतुश्चत्वारिँशच्च मे चतुश्चत्वारिँशच्च मेऽष्टाचत्वारिँशच्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २५ ॥


अर्थ - २७३. चार २७४. आठ २७५. बारा २७६. सोळा २७७. वीस २७८. चोवीस २७९. अठ्ठावीस २८०. बत्तीस २८१. छत्तीस २८२. चाळीस २८३. चवेचाळीस २८४. अठ्ठेचाळीस. ॥२५॥





विनियोग - 'त्र्यविश्च' इत्यादि दोन मंत्रांचा निरनिराळ्या वयाच्या पशूंचा होम करण्यांत विनियोग आहे.


त्र्यविश्च मे त्र्यवी च मे दित्यवाट् च मे दित्यौही च मे पञ्चाविश्च मे पञ्चावी च मे त्रिवत्सश्च मे त्रिवत्सा च मे तुर्यवाट् च मे तुर्यौही च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २६ ॥


अर्थ - २८५. दीड वर्षाचा बैल २८६. दीड वर्षाची गाय २८७. दोन वर्षांचा बैल २८८. दोन वर्षांची गाय २८९. अडीच वर्षांचा बैल २९०. अडीच वर्षांची गाय २९१. तीन वर्षांचा बैल २९२. तीन वर्षांची गाय २९३. साडेतीन वर्षांचा बैल २९४. साडेतीन वर्षांची गाय. ॥२६॥





विनियोग -


पष्ठवाट् च मे पष्ठौही च मऽ उक्षा च मे वशा च मऽ ऋषभश्च मे वेहच्च मे ऽनड्वाँश्च मे धेनुश्च मे यज्ञेन कल्पन्ताम् ॥ २७ ॥


अर्थ - २९५. चार वर्षांचा बैल २९६. चार वर्षांची गाय २९७. वीर्यसिंचन करण्यास समर्थ बैल २९८. वन्ध्या गाय २९९. अत्यंत तरुण बैल ३००. गर्भनाश करणारी गाय ३०१. शकटवहनसमर्थ बैल ३०२. नवीन प्रसविलेली धेनु. ॥२७॥





विनियोग - 'वाज' वगैरे या मंत्रांतील शब्दांचा उच्चार करून होम करावा.


वाजाय स्वाहा प्रसवाय स्वाहापिजाय स्वाहा क्रतवे स्वाहा वसवे स्वाहाऽहर्पतये स्वाहाह्ने मुग्धाय स्वाहा मुग्धाय वैनँशिनाय स्वाहा विनँशिनऽ आन्त्यायनाय स्वाहान्त्याय भौवनाय स्वाहा भुवनस्य पतये स्वाहाधिपतये स्वाहा प्रजापतये स्वाहा । इयं ते राण्मित्राय यन्तासि यमनऽ ऊर्जे त्वा वृष्ट्यै त्वा प्रजानां त्वाधिपत्याय ॥ २८ ॥


अर्थ - अन्नाकरितां होम असो, अनुज्ञादानाकरितां होम असो अशा रीतीनें मंत्रार्थ समजावा. किंवा वाज वगैरे चैत्रादि बारा मासांचीं नांवें आहेत. त्याकारणें होम असो, अन्न पुष्कळ उत्पन्न होतें म्हणून चैत्राला वाज म्हणतात. जालक्रीडेला आज्ञा देण्याचा प्रसंग म्हणून वैशाखाला प्रसव म्हणतात. तसेंच जलक्रीडेंत जन तत्पर होतात म्हणून ज्येष्ठाला अपिज, चातुर्मास्य याग त्यांत केले जातात म्हणून आषाढाला क्रतु, प्रवास न करतां घरींच राहण्याचा प्रसंग म्हणून श्रावणाला वसु, तापदायक असल्यानें भाद्रपदाला अहर्पति, धुकें उत्पन्न झाल्यानें मोह उत्पन्न करणारे दिवस म्हणून अश्विनाला मुग्ध अहन्, स्नानादि नियमानें पापांचा नाशक व दिवस लहान असल्यानें लवकर नाश पावणारा म्हणून कार्तिकाला अमुग्ध वैनशिन, अविनाशी व सर्व नाश झाला तरी शिल्लक राहणारा विष्णुरूपी म्हणून मार्गशीर्षाला अविनाशी आन्त्ययन, सर्व भुवनांचा अन्तस्वरूपी पोषक अर्थात् जाठराग्नि प्रदीप्त करून पुष्टि करणारा म्हणून पौषाला आन्त्य भौवन, स्नानादिकांचें पुण्य उत्पन्न करून सर्व प्राण्यांचा पालक म्हणून माघाला भुवनपति, अधिक पालक म्हणून फाल्गुनाला अधिपति, म्हणतात; अशा रीतीनें द्वादश मासांचा अधिपति जो प्रजापति त्याला हें हवि सुहुत असो. हे अग्ने, जेथें जेथें आम्ही यज्ञ करतों, हें तुझें राज्य आहे. तूं मित्र अशा यजमानाचा नियामक आहेस. तूं अग्निष्टोमादि कर्मांत सर्वांचे नियमन करतोस म्हणून विशिष्ट अन्नरसाकरितां, वृष्टीकरितां व प्रजेच्या स्वामित्वप्राप्तीकरितां वसोर्धारेनें तुजवर अभिषेक करतों. ॥२८॥





विनियोग - 'आयुर्यज्ञेन' या मंत्रानें कल्पहोम करावा.


आयुर्यज्ञेन कल्पतां प्राणो यज्ञेन कल्पतां चक्षुर्यज्ञेन कपताँ श्रोत्रं यज्ञेन कल्पतां वाग्‍यज्ञेन कल्पतां मनो यज्ञेन कल्पतामात्मा यज्ञेन कल्पतां ब्रह्मा यज्ञेन कल्पतां ज्योतिर्यज्ञेन कल्पताँ स्वर्यज्ञेन कल्पतां पृष्ठं यज्ञेन कल्पतां यज्ञो यज्ञेन कल्पताम् । स्तोमश्च यजुश्च ऽ ऋक् च साम च बृहच्च रथन्तरं च । स्वर्देवाऽ अगन्मामृताऽ अभूम प्रजापतेः प्रजाऽ अभूम वेट् स्वाहा ॥ २९ ॥


अर्थ - आयुष्य, प्राण, चक्षु, श्रोत्र, वाणी, मन, देह, वेद, स्वयंप्रकाश परमात्मा, स्वर्ग, पृष्ठस्तोत्र हीं मी केलेल्या यज्ञानें सिद्ध होवोत. तसेंच माझा यज्ञही यज्ञानेंच सिद्ध होवो. (मला स्वतःला यज्ञ करण्याचें सामर्थ्य नाहीं.) तसेंच त्रिवृत् पञ्चदशादि स्तोम, अनियत पादात्मक यजुर्मंत्र, नियतपादात्मक ऋग्मंत्र, गायनप्रधान साममंत्र व त्या सामांतील विशिष्ट भाग बृहत् व रथन्तर हीं सर्व मीं केलेल्या यज्ञानें सिद्ध होवोत. आम्ही यजमान देवरूपी होऊन स्वर्गाला गेलों व अमर होऊन तेथें हिरण्यगर्भाची प्रजा होऊन राहिलों. तात्पर्य हा वसोर्धाराहोम सर्वकामप्रद आहे. हें वसोर्धारारूपी हवि सुहुत असो. ॥२९॥





विनियोग - 'वाजस्य नु' इत्यादि सात मंत्रांनीं सर्वौषधरूपी हवीचा स्रुव्यानें होम करावा.


वाजस्य नु प्रसवे मातरं महीमदितिं नाम वचसा करामहे ।


अर्थ - अन्नाच्या आज्ञेंतच राहणारे आम्ही ज्या जगन्निर्माण करणार्‍या, मोठया व अखंडित अशा पृथिवीला अनुकूल करून घेतों व जिच्यांत हें सर्व जग प्रविष्ट झालें त्या पृथ्वीवरच राहण्याची प्रकाशमान सवित्यानें आम्हाला प्रेरणा करावी. ॥३०॥





विनियोग -


यस्यामिदं विश्वं भुवनमाविवेश तस्यां नो देवः सविता धर्म साविषत् ॥ ३० ॥


अर्थ - आज सर्व मरुद्गण येवोत, व इतर वसु, रुद्र व आदित्यरूपी मरुद्गण अन्नरूपी हविर्भक्षणानें संतुष्ट होण्याकरितां येवोत व त्यांच्या येण्यानें सर्व गार्हपत्यादि अग्नि प्रदीप्त होवोत व देवांचें संतोषानें सर्व गोभूहिरण्यादि द्रव्य व अन्न आम्हांला प्राप्त होवो. ॥३१॥





विनियोग -


विश्वेऽ अद्य मरुतो विश्वऽ ऊती विश्वे भवन्त्वग्नयः समिद्धाः । विश्वे नो देवाऽ अवसागमन्तु विश्वमस्तु द्रविणं वाजोऽ अस्मे ॥ ३१ ॥


अर्थ - आमचें अन्न प्राच्यादि चार दिशांना व भूः भुवः स्वः या तीन समीपस्थ लोकांना आणि महः जनः तपः सत्यं या चार दूरच्या लोकांना एकंदरित सातही लोकांना तृप्त करो. धनविभागाचे वेळीं आमचें अन्न सर्व देवांसह आमचें पालन करो. ॥३२॥





विनियोग -


वाजोः नः सप्त प्रदिशश्चतस्रो वा परावतः । वाजो नो विश्वैर्देवैर्धनसाताविहावतु ॥ ३२ ॥


अर्थ - आज अन्नाधिष्ठात्री देवता आम्हांला दानाची प्रेरणा करो म्हणजे आम्हांला अन्नदानाची इच्छा होवो. व ती अन्नाधिष्ठात्री देवता कालासह देवांना योग्यस्थानीं स्थापन करो. तसेंच ती देवता मला पुष्कळ पुत्रपौत्र देवो. नंतर समृद्धान्न होऊन त्या अन्नदानानें मी सर्व दिशांना जिंकेन. ॥३३॥





विनियोग -


वाजो नोऽ अद्य प्रसुवाति दानं वाजो देवाँ२ऽ ऋतुभिः कल्पयाति । वाजो हि मा सर्ववीरं जजान विश्वाऽ आशा वाजपतिर्जयेयम् ॥ ३३ ॥


अर्थ - अन्न माझे अग्रभागीं व गृहमध्यभागीं असो व तें आमच्या हविर्द्रव्यस्वरूपानें देवांना वाढवो. अन्न मला पुत्रपौत्रयुक्त करो व मी अन्नस्वामी होऊन सर्व दिशांना वश करीन. ॥३४॥





विनियोग -


वाजः पुरस्तादुत मध्यतो नो वाजो देवाँ हविषा वर्धयाति । वाजो हि मा सर्ववीरं चकार सर्वाऽ आशा वाजपतिर्भवेयम् ॥ ३४ ॥


अर्थ - हे अग्ने, पृथ्वीच्या रसानें, जलानें व औषधींनीं जो मी आपल्या शरीराला संयुक्त करतों असा मी ??? प्राप्त करतों. ॥३५॥





विनियोग -


सं मा सृजामि पयसा पृथिव्याः सं मा सृजाम्यद्‍भिरोषधीभिः । सोऽहं वाजँ सनेयमग्ने ॥ ३५ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं पृथ्वीवर, औषधींवर, स्वर्गांत व अन्तरिक्ष लोकांत रस स्थापन कर. व मजकरितां दिशा व विदिशा रसयुक्त होवोत. ॥३६॥





विनियोग - 'देवस्य त्वा' या मंत्रानें अध्वर्यूनें कृष्णाजिनावर बसलेल्या यजमानावर सर्वोषधींचा अभिषेक करावा.


पयः पृथिव्यां पयऽ ओषधीषु पयो दिव्यन्तरिक्षे पयो धाः । पयस्वतीः प्रदिशः सन्तु मह्यम् ॥ ३६ ॥


अर्थ - हे यजमाना, प्रेरक अशा सूर्याच्या प्रेरणेनें, अश्विनीकुमाराच्या बाहूंनीं, पूष्याच्या हातांनीं, वाणीचा नियामक जो प्रजापति त्याच्या नियमनानें व अग्नीच्या चक्रवर्तित्वानें मी तुजवर अभिषेक करतों. ॥३७॥





विनियोग - 'ऋताषाट्' इत्यादि बारा मंत्रांनीं राष्ट्रभृत्संज्ञक बारा आहुतींचा होम करावा. स्वाहान्तो मंत्रः या प्रमाणानें या एक एक मंत्रांत दोन मंत्र समजावे.


देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् । सरस्वत्यै वाचो यन्तुर्यन्त्रेणाग्नेः साम्राज्येनाभिषिञ्चामि ॥ ३७ ॥


अर्थ - जो सत्यालाच कबूल करतो व ज्याचें गृह अविनाशि आहे असा जो अग्निनामक गंधर्व आहे त्याच्या आनन्ददायक अशा सात औषधि मुद नांवाच्या अप्सरा आहेत तो आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचें रक्षण करो, त्या अग्नीला व त्या अप्सरांना हें हवि सुहुत असो. ॥३८॥





विनियोग -


ऋताषाडृतधामाग्निर्गन्धर्वस्तस्यौषधयोऽप्सरसो मुदो नाम । स नऽ इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा वाट् ताभ्यः स्वाहा ॥ ३९ ॥


अर्थ - दिवसरात्रींना जोडणारा व सर्वसामप्रतिपादित असा सूर्यनामक गंधर्व आहे त्याच्या एकमेकांत मिसळणार्‍या किरणरूपी आयु नांवाच्या अप्सरा आहेत तो सूर्य आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचें रक्षण करो. त्या सूर्याला व मरीचींना हें हवि सुहुत असो. ॥३९॥





विनियोग -


सुषुम्णः सूर्यरश्मिश्चन्द्रमा गन्धर्वस्तस्य नक्षत्राण्यप्सरसो भेकुरयो नाम । स नऽ इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा वाट् ताभ्यः स्वाहा ॥ ४० ॥


अर्थ - यज्ञद्वारा सुख देणारा व सूर्याप्रमाणें किरणें असलेला चन्द्र नांवाचा गंधर्व आहे. प्रकाशक नक्षत्रें त्याच्या भेकुर नांवाच्या अप्सरा आहेत तो चंद्र आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचें रक्षण करो. त्या चंद्राला व नक्षत्रांना हें हवि सुहुत असो. ॥४०॥





विनियोग -


इषिरो विश्वव्यचा वातो गन्धर्वस्तस्यापोऽ अप्सरसऽ ऊर्जो नाम । स नऽ इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा वाट् ताभ्यः स्वाहा ॥ ४१ ॥


अर्थ - शीघ्रगामी व सर्वगामी असा वात नामक गंधर्व आहे. धान्योत्पादक जलें या त्याच्या ऊर्ज नांवाच्या अप्सरा आहेत. तो वात आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचें रक्षण करो. त्या वाताला व जलांना हें हवि सुहुत असो. ॥४१॥





विनियोग -


भुज्युः सुपर्णो यज्ञो गन्धर्वस्तस्य दक्षिणाऽ अप्सरस स्तावा नाम । स नऽ इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा वाट् ताभ्यः स्वाहा ॥ ४२ ॥


अर्थ - भूतांचें पालन करणारा व स्वर्गांत गमन करणारा यज्ञ नांवाचा गंधर्व आहे. यजमानाची स्तुति करणार्‍या दक्षिणातावा नांवाच्या त्याच्या अप्सरा आहेत. तो यज्ञ आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचे रक्षण करो. त्या यज्ञाला व दक्षिणांना हें हवि सुहुत असो. ॥४२॥





विनियोग -


प्रजापतिर्विश्वकर्मा मनो गन्धर्वस्तस्यऽ ऋक्सामान्यप्सरसऽ एष्टयो नाम । स नऽ इदं ब्रह्म क्षत्रं पातु तस्मै स्वाहा वाट् ताभ्यः स्वाहा ॥ ४३ ॥


अर्थ - प्रजापालक व सर्वकार्यकर्ता मन नांवाचा गंधर्व आहे. आकांक्षा पूर्ण करणारे ऋक्साममंत्र त्याच्या एष्टि नांवाच्या अप्सरा आहेत. तो मनोगंधर्व आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातींचें रक्षण करो. त्या मनाला व ऋक्साममंत्रांना हें हवि सुहुत असो. ॥४३॥





विनियोग - प्रतिप्रस्थाता इत्यादिकांनीं ???चें शिर आहवनीयावर धरावें. नंतर अध्वर्यूनें 'स नो भुवनस्य' हा मंत्र पांच वेळां म्हणून आज्याच्या पांच आहुति द्याव्या.


स नो भुवनस्य पते प्रजापते यस्य तऽ उपरि गृहा यस्य वेह । अस्मै ब्रह्मणेऽस्मै क्षत्राय महि शर्म यच्छ स्वाहा ॥ ४४ ॥


अर्थ - हे भुवनपालक प्रजापते, ज्या तुझे स्वर्गावर व या भूलोकांवर गृहपात्र आहेत, तो तूं आमच्या ब्राह्मण व क्षत्रिय जातीला पुष्कळ सुख दे. हें हवि सुहुत असो. ॥४४॥





विनियोग - नंतर 'समुद्रोऽसि' इत्यादि तीन मंत्रभागांनीं तीन वायुहोम करावे.


समुद्रोऽसि नभस्वानार्द्रदानुः शम्भूर्मयोभूरसि मा वाहि स्वाहा मारुतोऽसि मरुतां गणः शम्भूर्मयोभूरभि मा वाहि स्वाहावस्यूरसि दुवस्वाञ्छम्भूर्मयोभूरभि मा वाहि स्वाहा ॥ ४५ ॥


अर्थ - हे वायो, वक्ष्यमाणगुणविशिष्ट असा तूं आमच्या सन्मुख वहा. तुला हें हवि सुहुत असो. तूं नक्षत्रयुक्त, वृष्टिदायक, ऐहिक, व पारलौकिक सुख देणारा आहेस व तूं शुक्रज्योतिःप्रभृति मरुद्गणांचा अधिपति असून ऐहिक व पारलौकिक सुख देणारा आहेस. तसेंच तूं रक्षण करणारा व हविर्द्रव्ययुक्त असून ऐहिक व पारलौकिक सुख देणारा आहेस. ॥४५॥





विनियोग - 'यास्ते' इत्यादि नऊ मंत्रांनीं नवाहुतींचा होम करावा. पहिले चार मंत्र सर्व म्हणून होम करावा. पांचव्या 'स्वर्णधर्मः स्वाहा' या मंत्राचे स्वाहापर्यंतचे पांच भाग करावे व नऊ आहुती द्याव्या.


यास्तेऽ अग्ने सूर्ये रुचो दिवमातन्वन्ति रश्मिभिः । ताभिर्नोऽ अद्य सर्वाभी रुचे जनाय नस्कृधि ॥ ४६ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्या तुझ्या कांति सूर्यमंडलांत राहून आपल्या किरणांनीं द्युलोकाला प्रकाशित करतात त्या सर्वांच्या योगानें आज आमची शोभा वाढव व शोभायुक्त म्हणजे प्रसिद्ध असे पुत्रपौत्रादिक आम्हांला दे. ॥४६॥





विनियोग -


या वो देवाः सूर्ये रुचो गोष्वश्वेषु या रुचः । इन्द्राग्नी ताभिः सर्वाभी रुचं नो धत्त बृहस्पते ॥ ४७ ॥


अर्थ - हे देवांनो, हे इंद्राग्नींनो, हे बृहस्पते, तुमच्यासंबंधीं ज्या कांति सूर्यमंडलांत व गोअश्व यांत आहेत त्या सर्वांच्या योगानें आम्हांला कांति द्या. ॥४७॥





विनियोग -


रुचं नो धेहि ब्राह्मणेषु रुचँ राजसु नस्कृधि । रुचं विश्येषु शूद्रेषु महि धेहि रुचा रुचम् ॥ ४८ ॥


अर्थ - हे अग्ने, आमच्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र जातींचें ठायीं कांति स्थापन कर. व माझें ठायींहि अविच्छिन्न अशी ती कांति स्थापन कर. ॥४८॥





विनियोग -


तत्त्वा यामि ब्रह्मणा वन्दमानस्तदाशास्ते यजमानो हविर्भिः । अहेडमानो वरुणेह बोध्युरुशँस मा नऽ आयुः प्रमोषीः ॥ ४९ ॥


अर्थ - हे वरुणा, यजमान हविर्भाग देऊन तुझ्याकडे जे जे वर मागतो ते ते देण्याविषयीं तीन वेदांनीं स्तुति करणारा मी तुझी प्रार्थना करतों ते तूं त्याला दे. हे बहुस्तुतियुक्त वरुणा, क्रोध न करितां माझी स्तुति तूं समजून घे. व आमचें आयुष्य चोरूं नकोस. अर्थात् आम्हांला पूर्ण आयुष्य दे. ॥४९॥





विनियोग -


स्वर्ण घर्मः स्वाहा स्वर्णार्कः स्वाहा स्वर्ण शुक्रः स्वाहा स्वर्ण ज्योतिः स्वाहा स्वर्ण सूर्यः स्वाहा ॥ ५० ॥


अर्थ - दिवसाप्रमाणें जो आदित्य त्याचा मी अग्नींत होम करतों. सूर्याप्रमाणें जो अग्नि त्याचा मी आदित्यांत होम करतों. देवाप्रमाणें आदित्य त्याचा मी आदित्यांतच होम करतों. स्वर्गाप्रमाणें जो अग्नि त्याचा मी अग्नींतच होम करतों. सर्व देवांप्रमाणें जो सूर्य त्याला मी उत्तम करतों. आदित्याचा अग्नींत होम म्हणजे त्याची अग्नींत स्थापना. अशा रीतीनें अग्नि व सूर्य यांचें ऐक्य सांगून सर्व देवांत सूर्य उत्तम असें या मंत्रांत सांगितलें आहे. ॥५०॥





विनियोग - 'अग्निं युनज्मि' इत्यादि तीन मंत्रांनीं परिधींचा स्पर्श करून अग्निसंयोग करावा.


अग्निं युनज्मि शवसा घृतेन दिव्यँ सुपर्णं वयसा बृहन्तम् । तेन वयं गमेम ब्रध्नस्य विष्टपँ स्वो रुहाणाऽ अधि नाकमुत्तमम् ॥ ५१ ॥


अर्थ - बलाशीं व घृताशीं मी अग्नीचा संयोग करतों. तो अग्नि द्युलोकांत राहणारा, उत्तम गमन करणारा व धूमानें मोठा होणारा असा आहे. त्या अग्नीशीं संयुक्त होऊन आम्ही तापरहित अशा आदित्याच्या लोकांप्रत जाऊं. नंतर त्याच्याही पलीकडे स्वर्गावर आरोहण करण्याकरितां उत्तम व दुःखरहित अशा नाकलोकांस जाऊं. ॥५१॥





विनियोग -


इमौ ते पक्षावजरौ पतत्रिणौ याभ्यां रक्षाँस्यपहँस्यग्ने । ताभ्यां पतेम सुकृतामु लोकं यत्रऽ ऋषयो जग्मुः प्रथमजाः पुराणाः ॥ ५२ ॥


अर्थ - हे अग्ने, जे तुझे सर्वदा जरारहित व उत्पतनशील उत्तर व दक्षिण पक्ष आहेत व ज्यांच्यायोगें तूं राक्षसांना मारतोस त्या पक्षांच्या योगानें आम्ही पुण्यवानांच्या लोकांप्रत उडून जाऊं. त्या लोकांत पूर्वोत्पन्न प्राचीन ऋषि गेले. ॥५२॥





विनियोग -


इन्दुर्दक्षः श्येन ऽ ऋतावा हिरण्यपक्षः शकुनौ भुरण्युः । महान्त्सधस्थे ध्रुवऽ आ निषत्तौ नमस्ते ऽ अस्तु मा मा हिँसीः ॥ ५३ ॥


अर्थ - हे अग्ने, वक्ष्यमाणविशेषणविशिष्ट अशा तुला नमस्कार असो. तूं आमची हिंसा करूं नकोस. तूं ऐश्वर्यसंपन्न, उत्साही, श्येन पक्ष्याप्रमाणें आकाशांत संचार करणारा, सत्ययुक्त, सुवर्णपक्ष असलेल्या पक्ष्यासारखा, पोषण करणारा, प्रभाववान्, स्थिर व एका आसनावर ब्रह्म्याबरोबर बसणारा आहेस. ॥५३॥





विनियोग - 'दिवो मूर्धा' इत्यादि दोन ऋचांनीं परिधिसंधींना स्पर्श करून अग्निसंयोग करावा.


दिवो मूर्धासि पृथिव्या नाभिरूर्गपामोषधीनाम् । विश्वायुः शर्म सुप्रथा नमस्पथे ॥ ५४ ॥


अर्थ - हे अग्ने, स्वर्गमार्गरूपी अशा तुला नमस्कार असो. तूं स्वर्लोकाचें मस्तक, पृथ्वीचा मध्यभाग, जलें व औषधींचा सारभूत रस, सर्व प्राण्यांचें जीवन, सर्वांचें कल्याण करणारा व वरखालीं वगैरे सर्वत्र विस्तृत असा आहेस. ॥५४॥





विनियोग -


विश्वस्य मूर्धन्नधि तिष्ठसि श्रितः समुद्रे ते हृदयमप्स्वायुरपो दत्तोदधिं भिन्त । दिवस्पर्जन्यादन्तरिक्षात्पृथिव्यास्ततो नो वृष्ट्याव ॥ ५५ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं द्युलोकांतून, मेघांतून, अन्तरिक्षांतून, पृथिवींतून व जेथें जेथें जल असेल तेथून जल आणून वृष्टिद्वारां आमचें रक्षण कर. तूं सुषुम्णा नाडीद्वारां सर्व जगाच्या मस्तकांत राहतोस म्हणजे आदित्यद्वारां प्रकाशतोस. तुझें हृदय अन्तरिक्ष लोकांत आहे व तुझ्या जलावर सगळ्यांचें जीवन अवलंबून आहे. तूं मेघ फोडून आम्हांला जलें दे. ॥५५॥





विनियोग - 'इष्टो यज्ञ' इत्यादि दोन मंत्रांनीं समिष्ठयजुःसंज्ञक हविर्द्रव्याचा होम करावा.


इष्टो यज्ञो भृगुभिराशीर्दा वसुभिः । तस्य नऽ इष्टस्य प्रीतस्य द्रविणेहागमेः ॥ ५६ ॥


अर्थ - हे द्रव्या, आम्हांला आवडत्या व आमच्यावर प्रेम करणार्‍या या यजमानाचे घरीं तूं ये. या यजमानाचा इष्ट देणारा असा यज्ञ भृगुगोत्री ब्राह्मणांनीं व वस्वादि देवांनीं केला. ॥५६॥





विनियोग -


इष्टोऽ अग्निराहुतः पिपर्तु नऽ इष्टँ हविः । स्वगेदं देवेभ्यो नमः ॥ ५७ ॥


अर्थ - अग्नि आमचें इच्छित पूर्ण करो. त्या अग्नीचा याग झाला आहे व त्याला उत्तम हवि दिलें गेलें आहे, तसेंच हें स्वयंगमनशील समिष्टयजुसंज्ञक हविर्द्रव्य देवांना सुहुत असो. ॥५७॥





विनियोग - 'यदा कूतात्' इत्यादि आठ मंत्रांनीं आठ स्रुवाहुतींचा होम करावा.


यदाकूतात्समसुस्रोद्धृदो वा मनसो वा सम्भृतं चक्षुषो वा । तदनु प्रेत सुकृतामु लोकं यत्रऽ ऋषयो जग्मुः प्रथमजाः पुराणाः ॥ ५८ ॥


अर्थ - हे ऋत्विजांनो, तुम्ही प्रजापतिकृतकर्माचें अनुसरण करा व पुण्यवानांना प्राप्य अशा स्वर्गलोकाप्रतच गमन करा. त्या लोकांत पूर्वोत्पन्न पुराण ऋषि गमन करते झाले. तें पूर्वोक्तपूर्ण, सामग्रीयुक्त कर्म प्रजापतीच्या अभिप्रायानुसार त्याच्या हृदय, बुद्धि, संकल्प व चक्षुरादि इंद्रियें यांपासून उत्पन्न झालें व ब्रह्मदेवानें जें सर्व तर्‍हेनें निर्माण केलें. ॥५८॥





विनियोग -


एतं सधस्थ परि ते ददामि यमावहाच्छेवधिं जातवेदाः । अन्वागन्ता यज्ञपतिर्वोऽ अत्र तँ स्म जानीत परमे व्योमन् ॥ ५९ ॥


अर्थ - हे देवनिवासस्थान अशा स्वर्गा, हा यजमान मी तुझ्या स्वाधीन करतों व अग्नीनें सुखनिधान असें जें यज्ञफल निर्माण केलें तेंहि रक्षणाकरितां तुझ्या स्वाधीन करतों. हे देवांनो, हा यजमान कर्मसमाप्तीनंतर तुमच्याकडे येईल तेव्हां अशा रीतीनें उत्कृष्ट आकाशरूपी स्वर्गांत आलेल्या यजमानाची तुम्ही ओळख ठेवा म्हणजे त्याला ओळखून तुम्ही त्याची संभावना करा. ॥५९॥





विनियोग -


एतं जानाथ परमे व्योमन्देवाः सधस्था विद रूपमस्य । यदागच्छात्पथिभिर्देवयानैरिष्टापूर्त्ते कृणवाथाविरस्मै ॥ ६० ॥


अर्थ - उत्कृष्ट स्वर्गावर एकत्र राहणार्‍या हे देवांनो, या यजमानाला ओळखा. व ओळखीकरितां त्याचें रूप समजून ठेवा. व ज्यावेळीं हा स्वर्गमार्गांनीं येईल त्यावेळीं याच्या इष्टापूर्तकर्मांची फलें याला प्रकट करा म्हणजे द्या. ॥६०॥





विनियोग -


उद्‍बुध्यस्वाग्ने प्रतिजागृहि त्वमिष्टापूर्ते सँसृजेथामयं च । अस्मिन्त्सधस्थेऽ अध्युत्तरस्मिन्विश्वे देव यजमानश्च सीदत ॥ ६१ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं सावधान हो व या यजमानाला रोज सावध कर. नंतर इष्टापूर्तकर्मे यजमानाशीं युक्त होवोत. व हा यजमान इष्टापूर्तकर्मांशीं युक्त होवो. हे विश्वेदेवांनो, तुम्ही व हा इष्टापूर्तकारी यजमान देवांसह असणार्‍या या अत्युत्कृष्ट द्युलोकांत राहो. ॥६१॥





विनियोग -


येन वहसि सहस्रं येनाग्ने सर्ववेदसम् । तेनेमं यज्ञं नो नय स्वर्देवेषु गन्तवे ॥ ६२ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्या सामर्थ्यानें तूं सहस्रदक्षिणायुक्त व सर्वस्वदक्षिणायुक्त यज्ञ धारण करतोस त्याच सामर्थ्यानें आमच्या यज्ञाला देवांकडे जाण्याकरितां स्वर्गांत ने. ॥६२॥





विनियोग -


प्रस्तरेण परिधिना स्रुचा वेद्या च बर्हिषा । ऋचेमं यज्ञं नो नय स्वर्देवेषु गन्तवे ॥ ६३ ॥


अर्थ - हे अग्ने, आमच्या या यज्ञाला देवांकडे जाण्याकरितां स्वर्गांत ने. हा यज्ञ दर्भमुष्टि, तीन परिधिकाष्ठें, ???, वेदी, दर्भ व ऋगादिमंत्र यांनीं युक्त आहे. ॥६३॥





विनियोग -


यद्दत्तं यत्परादानं यत्पूर्तं याश्च दक्षिणाः । तदग्निर्वैश्वकर्मणः स्वर्देवेषु नो दधत् ॥ ६४ ॥


अर्थ - आम्ही कुटुंबियांनीं दिलेलें, परोपकाराचे निमित्तानें अंधादिकांना दिलेलें, स्मृतिविहित असें कूपारामादि व यज्ञांतील दक्षिणा एतद्रूपी आम्हीं केलेलें दान विश्वकर्मा अग्नि स्वर्गांत देवांचें ठायीं स्थापन करो. ॥६४॥





विनियोग -


यत्र धाराऽ अनपेता मधोर्घृतस्य च याः । तदग्निर्वैश्वकर्मणः स्वर्देवेषु नो दधत् ॥ ६५ ॥


अर्थ - ज्या ठिकाणीं मधुघृतादिकांचें प्रवाह अक्षीण तर्‍हेनें वाहतात त्या स्वर्गांत देवांमध्यें अग्नि आम्हांला स्थापन करो. ॥६५॥





विनियोग -


अग्निरस्मि जन्माना जातवेदा घृतं मे चक्षुरमृतं मऽ आसन् । अर्कस्त्रिधातू रजसो विमानोऽजस्रो घर्मो हविरस्मि नाम ॥ ६६ ॥


अर्थ - मी जन्मतःच उत्पन्न झालेल्या सर्व वस्तूंचा स्वामी आहें, म्हणून माझे नेत्रांचे ठायीं घृत व मुखाचे ठायीं अमृत आहे. मी पूज्य असा ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदात्मक यज्ञ आहे. मी जलांचा निर्माण करणारा अक्षय्य मेघरूपी व प्रदीप्त असा सूर्यरूपी अग्नि आहे. ॥६६॥





विनियोग - या मंत्रांपैकीं 'ये अग्नय' या भागानें अग्नींचें उपस्थान करावें.


ऋचो नामास्मि यजूँषि नामास्मि सामानि नामास्मि । येऽ अग्नयः पाञ्चजन्याऽ अस्यां पृथिव्यामधि । तेषामसि त्वमुत्तमः प्र नो जीवातवे सुव ॥ ६७ ॥


अर्थ - मी नामतः ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेदरूपी आहें म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हीं माझीं नांवें आहेत. हे चित्याग्ने या पृथिवींवर मनुष्यहितकारी जे अग्नि आहेत त्यांमध्यें तूं श्रेष्ठ आहेस म्हणून आमच्या दीर्घायुष्याची प्रेरणा कर म्हणजे आम्हांला पुष्कळ वर्षेपर्यंत वांचव. ॥६७॥





विनियोग - 'वार्त्रहत्याय' इत्यादि सात, आठ अथवा दहा मंत्रांनीं चितीचें उपस्थान करावें, सूत्रकारानें इथें तीन मतें दिलीं आहेत.


वार्त्रहत्याय शवसे पृतनाषाह्याय च । इन्द्र त्वावर्तयामसि ॥ ६८ ॥


अर्थ - हे इंद्रा, दैत्यहननसमर्थ व शत्रुसेनाविनाशसमर्थ अशा बलाच्या वृद्धीकरितां आम्ही तुझें उपस्थान करतों. ॥६८॥





विनियोग -


सहदानुं पुरुहूत क्षियन्तमहस्तमिन्द्र संपिणक् कुणारुम् । अभि वृत्रं वर्धमानं पियारुमपादमिन्द्र तवसा जघन्थ ॥ ६९ ॥


अर्थ - पुष्कळ यजमानांकडून बोलावल्या गेलेल्या हे इंद्रा, उत्साहरूपी बलाच्या वर्धक अशा शत्रूला हस्तहीन करून त्याचें चूर्ण कर. तो शत्रु समीप निवास करणारा, वाईट वाक्यें बोलणारा असा आहे. हे इंद्रा, जगाला व्याप्त करणार्‍या, देवनाशक अशा वृत्रासुराचे पाय तोडून बलानें त्याला मार. ॥६९॥





विनियोग -


वि न* इन्द्र मृधो जहि नीचा यच्छ पृतन्यतः । योऽ अस्माँ२ऽ अभिदासत्यधरं गमया तमः ॥ ७० ॥


अर्थ - हे इंद्रा, आमच्या संग्रामांचा नाश कर व आमच्या शत्रूंना युद्धापासून परावृत्त कर. तसेंच जो आमचा क्षय करतो, अशा शत्रूला अधोभागीं नरकांत पाठव. ॥७०॥





विनियोग -


मृगो न भीमः कुचरो गिरिष्ठाः परावतऽ आजगन्था परस्याः । सृकँ सँशाय पविमिन्द्र तिग्मं वि शत्रून्ताढि वि मृधो नुदस्व ॥ ७१ ॥


अर्थ - हे इंद्रा, फार दूरच्या देशांतून व लांबच्या दिशेकडूनही तूं ये व येथें येऊन शत्रूंचें विशेषेंकरून ताडण कर व शत्रुशरीरांत शिरणार्‍या वज्राला तीक्ष्ण करून संग्रामांना दूर सार. (यास दृष्टांत) ज्याप्रमाणें भयंकर, वांकडा-तिकडा चालणारा व पर्वतांत राहणारा सिंह दुरून येऊन प्राण्यांना मारतो. ॥७१॥





विनियोग -


वैश्वानरो नऽ ऊतयऽ आ प्र यातु परावतः । अग्निर्नः सुष्टुतीरुप ॥ ७२ ॥


अर्थ - वैश्वानर अग्नि आमच्या रक्षणाच्या निमित्तानें आमच्या स्तुति ऐकण्याकरितां दूर देशांतून येवो. ॥७२॥





विनियोग -


पृष्टो दिवि पृष्टोऽ अग्निः पृथिव्यां पृष्टो विश्वाऽ ओषधीरा विवेश । वैश्वानरः सहसा पृष्टोऽ अग्निः स नो दिवा स रिषस्पातु नक्तम् ॥ ७३ ॥


अर्थ - आदित्यरूपानें हा कोण प्रकाशतो आहे असें मुमुक्षूंनीं द्युलोकांत विचारला गेलेला, हा विद्युद्रूपानें कोण प्रकाशतो असें जलार्थीजनांनी अन्तरिक्षांत विचारला गेलेला, व जो सर्व व्रीह्यादि औषधींत प्रविष्ट झाल्यानें हा जीवनहेतु कोण आहे असें विचारला गेलेला तसेंच अध्वर्यूनें बलानें मंथन केल्यावर लोकांकडून हा कोण आहे असें विचारला गेलेला विश्वकर्मा अग्नि रात्रंदिवस आमचें वधापासून रक्षण करो म्हणजे आमचा वध न करो. ॥७३॥





विनियोग -


अश्याम तं काममग्ने तवोतीऽ अश्याम रयिं रयिवः सुवीरम् । अश्याम वाजमभि वाजयन्तोऽश्याम द्युम्नमजराजरं ते ॥ ७४ ॥


अर्थ - हे अग्ने, तुझ्या पालनानें आम्ही इच्छित फल मिळवूं व हे धनवन् अग्ने, आम्ही पुत्रसहित धन मिळवूं आणि अग्नीची पूजा करणारे आम्ही सर्वत्र अन्न मिळवूं. तसेंच हे जरारहित अग्ने, आम्ही तुझी अक्षय्य कीर्ति मिळवूं. ॥७४॥





विनियोग -


वयं तेऽ अद्य ररिमा हि काममुत्तानहस्ता नमसोपसद्य । यजिष्ठेन मनसा यक्षि देवानस्रेधता मन्मना विप्रोऽ अग्ने ॥ ७५ ॥


अर्थ - हे अग्ने, मुक्तहस्ताचे आम्ही सावध, वागतत्पर, एकाग्रतायुक्त व देवता??? जाणणार्‍या मनानें नमस्कारपूर्वक आज तुला यथेष्ट हवि देतों, म्हणून बुद्धिमान् अशा तूं आम्हीं दिलेल्या हविर्द्रव्यानें देवांचा याग कर. ॥७५॥





विनियोग -


धामच्छदग्निरिन्द्रो ब्रह्मा देवो बृहस्पतिः । सचेतसो विश्वे देवा यज्ञं प्रावन्तु नः शुभे ॥ ७६ ॥


अर्थ - गृहांचें आच्छादन करणारे म्हणजे न्यूनातिरिक्तता घालवून कर्मांत समता आणणारे व एकमतानें वागणारे असे अग्नि, इन्द्र, ब्रह्मदेव, बृहस्पति व विश्वेदेव हे सर्व देव आमच्या यज्ञाला विशेषेंकरून रक्षण करोत व इष्ट अशा स्वर्गस्थानांत त्याचे स्थापन करोत. ॥७६॥





विनियोग -


त्वं यविष्ठ दाशुषो नॄँ पाहि शृणुधी गिरः । रक्षा तोकमुत त्मना ॥ ७७ ॥


अर्थ - हे तरुणतम अग्ने, आमच्या स्तुतिवाक्यांचें श्रवण कर व हविर्द्रव्यें देणार्‍या यजमानांचें रक्षण कर व तूं स्वतः यजमानापत्याचेंहीं रक्षण कर. ॥७७॥





॥ अष्टादशोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP