![]() |
श्रीमद् भागवत महापुराण
स्कंध १० वा - अध्याय ३८ वा - अन्वयार्थ
अक्रूराचे व्रजगमन - च - आणि - महामतिः अक्रूरः अपि - विशाल आहे बुद्धि ज्याची असा अक्रूरहि - तां रात्रिं मधुपुर्यां उषित्वा - त्या रात्री मथुरेत राहून - रथं आस्थाय - रथात बसून - नन्दगोकुलं प्रययौ - नंदाच्या गौळवाडयास गेला. ॥१॥ अम्बुजेक्षणे भगवति - भगवान कमलनयन श्रीकृष्णाच्या ठिकाणी - परां भक्तिं उपगतः - श्रेष्ठ भक्तीप्रत प्राप्त झालेला - महाभागः (सः) - मोठा भाग्यवान असा तो अक्रूर - पथि गच्छन् - रस्त्याने जात असता - एवं एतत् अचिन्तयत् - अशा प्रकारे मनात आणिता झाला. ॥२॥ मया किं भद्रं आचरितं - मी कोणते पुण्य आचरिले - किं परमं तपः तप्तं - कोणते श्रेष्ठ तप केले - अथ अपि वा - किंवा तसेच - अर्हते किं दत्तं - सत्पात्री कोणते दान केले - यत् - ज्याच्या योगाने - अद्य केशवं द्रक्ष्यामि - आज मी श्रीकृष्णाला पाहीन. ॥३॥ विषयात्मनः शूद्रजन्मनः - विषयासक्त अशा शूद्रयोनीत जन्मलेल्याला - यथा ब्रह्मकीर्तनं (दुर्लभम्) - जसे वेदाध्ययन दुर्लभ - एतत्उत्तमश्लोकदर्शनम् - हे उत्तमश्लोक अशा श्रीकृष्णाचे दर्शन - मम दुर्लभं मन्ये - मला दुर्लभ आहे असे मी मानितो. ॥४॥ मा एवं - असे नाही - अधमस्य मम अपि - नीच अशा मलाहि - अच्युतदर्शनं स्यात् एव - श्रीकृष्णाचे दर्शन होणारच - कालनद्या ह्लियमाणः कश्चन - काळरूपी नदीने वाहून नेला जाणारा एखादा प्राणी सुद्धा - क्वचित् - एखादे वेळी - तरति - तरून जातो. ॥५॥ अद्य मम अमङगलं नष्टं - आज माझे पाप नाहीसे झाले - च - आणि - मे भवः फलवान् एव (जातः) - माझा जन्म सफलच झाला - यत् - ज्याअर्थी - भगवतः योगिध्येयाङ्घ्रिपङकजं - योग्यांनी ध्यान करण्यास योग्य अशा श्रीकृष्णाच्या पदकमळाला - नमस्ये - मी नमस्कार करीन. ॥६॥ अद्य बत - आज खरोखर - कंसः मे अत्यनुग्रहं (एव) अकृत - कंस मजवर मोठी कृपाच करिता झाला - अमुना प्रहितः अहं - त्याने पाठविलेला असा मी - पूर्वे - पूर्वकाळचे लोक - यन्नखमण्डलत्विषा - ज्याच्या नखसमूहाच्या तेजाने - दुरत्ययं तमः - ओलांडण्यास कठीण अज्ञानाला - अतरन् - ओलांडते झाले - (तस्य) कृतावतारस्य हरेः - घेतलेला आहे अवतार ज्याने अशा श्रीकृष्णाच्या त्या - अङ्घ्रिपङकजं - पदकमळाला - द्रक्ष्ये - मी पाहीन. ॥७॥ ब्रह्मभवादिभिः सुरैः - ब्रह्मदेव, शंकर इत्यादि देवांनी - देव्या स्त्रिया - देवी लक्ष्मीने - च - आणि - ससात्त्वतैः मुनिभिः - भक्तांसह मुनींनी - अनुचरैः (सह) - सोबत्यांबरोबर - गोचरणाय वने चरत् यत् - गाईंना चारण्यासाठी रानात फिरणारे जे - अर्चितम् - पूजिले - च - आणि - यत् - जे - गोपिकानां कुचकुङ्कुमाङ्कितं (अस्ति) - गोपींच्या स्तनांवरील केशराने युक्त आहे.॥८॥ सुकपोलनासिकं - सुंदर आहेत गाल व नाक ज्याच्या ठिकाणी असे - स्मितावलोकारुणकञ्जलोचनं - हास्ययुक्त पाहणे व रक्तकमलासारखे आहेत नेत्र ज्याचे असे - गुडालकावृतं - कुरळ्या केसांनी आच्छादलेले - मुकुन्दस्य मुखं - श्रीकृष्णाचे मुख - नूनं द्रक्ष्यामि - खरोखर मी पाहीन - यत् - कारण - मृगाः - हरिण - मे प्रदक्षिणं प्रचरन्ति - माझ्या उजव्या बाजूने जात आहेत. ॥९॥ अद्य - आज - निजेच्छया भुवः - स्वतःच्या इच्छेने पृथ्वीचा - भारावताराय मनुजत्वं ईयुषः - भार उतरण्यासाठी मनुष्यरूपाला प्राप्त झालेल्या अशा - लावण्यधाम्नः - सौंदर्याचे स्थान अशा - विष्णोः - श्रीविष्णूचे - उपलंभनं - दर्शन - अपि भविता - होईल ना - अञ्जसा - अनायासाने - मह्यं - माझ्या - दृशः - दृष्टीचे - फलं न स्यात् - फळ होणार नाही - न - नाही (का) ॥१०॥ सदसतोः ईक्षिता अपि - बर्यावाईटाचा पाहणारा असूनहि - अहंरहितः - अहंकाराने रहित असलेला - स्वतेजसा - स्वतःच्या सामर्थ्याने - अपास्ततमोभिदाभ्रमः - दूर केली आहेत अज्ञान, भेदबुद्धि व मोह ज्याने असा - यः - जो - स्वमायया - आपल्या मायेने - प्राणाक्षधीभिः (सह) - प्राण, इंद्रिये व बुद्धि यांसह - आत्मन्रचितैः (जीवैः) - आपल्या ठिकाणी रचिलेल्या जीवाच्या योगाने - सदनेषु - अनेक स्थानी - अभीयते - प्रत्ययास येतो. ॥११॥ यस्य - ज्याच्या - सुमङगलैः - अत्यंत मंगलकारक अशा - अखिलामीवहभिः - सर्व पातके नष्ट करणार्या - गुणकर्मजन्मभिः - गुणांनी, कृत्यांनी व अवतारांनी - विमिश्राः वाचः - गौरविलेले असे बोल - जगत् - जगाला - प्राणन्ति - हालवितात - शुम्भन्ति - शोभवितात - च - आणि - पुनन्ति - पवित्र करितात - याः तद्विरक्ताः (ताः) - जे त्यांनी रहित असे बोल ते - शवशोभनाः (इति) - प्रेताचे अलंकार असे - मताः (सन्ति) - मानिलेले आहेत. ॥१२॥ सः - तो - स्वसेतुपाला - आपण घातलेल्या मर्यादांचे पालन करणार्या - अमरवर्यशर्मकृत् - देवश्रेष्ठांचे कल्याण करणारा असा - सात्त्वतान्वये अवतीर्णः - यादवांच्या कुलांत अवतरलेला - ईश्वरः - ईश्वर - देवाः अशेषमङगलं यत् गायन्ति - देव सर्वस्वी मंगलकारक अशा ज्याचे गायन करतात - (तत्) यशः वितन्वन् - ते यश पसरीत - व्रजे किल आस्ते - गोकुळात राहत आहे. ॥१३॥ महतां गतिम् - श्रेष्ठ पुरुषांचे आश्रयस्थान - गुरुं - श्रेष्ठ अशा - श्रियः इप्सितास्पदं - लक्ष्मीच्या इच्छेचा विषय अशा - दृशिमन्महोत्सवं - डोळे असलेल्या प्राण्यांचा मोठा आनंदच अशा - त्रैलोक्यकान्तं - तिन्ही लोकांत सुंदर अशा - रूपं - रूपाला - दधानं - धारण करणार्या - तं - त्याला - अद्य नूनं द्रक्ष्ये - आज खरोखरच मी पाहीन - मम - मला - उषसः - पहाटेपासून - सुदर्शनाः आसन् - चांगले शकुन झाले आहेत. ॥१४॥ अथ - नंतर - अहं - मी - सपदि रथात् अवरूढः (सन्) - लगेच रथातून खाली उतरून - योगिभिः अपि - योग्यांनीही - स्वलब्धये - आत्मप्राप्तीसाठी - धिया धृतं - बुद्धीच्या योगाने धारण केलेल्या - प्रधानपुंसोः ईशयोः चरणं - पुरुषांमध्ये श्रेष्ठ अशा परमेश्वरस्वरूपी रामकृष्णांच्या पायाला - च - आणि - आभ्यां (सह) - त्यांच्याबरोबर - वनौकसः सखीन् - रानात राहणार्या मित्रांना - ध्रुवं नमस्ये - निश्चयाने मी नमस्कार करीन. ॥१५॥ विभुः - श्रीकृष्ण - अङ्घ्रिःमूले पतितस्य मे - पाया पडलेल्या माझ्या - शिरसि - मस्तकावर - कालभुजङगरंहसा - काळरूपी सापाच्या वेगाने - प्रोद्वेजितानां - त्रासलेल्या - शरणैषिणां - शरण येऊ इच्छिणार्या - नृणां - मनुष्यांना - दत्ताभयं - दिले आहे अभय ज्याने असा - निजहस्तपङकजं - आपला कमळासारखा हात - अपि अधास्यत् - ठेवील ना. ॥१६॥ कौशिकः - इंद्र - तथा - तसाच - बलिः - बलि - यत्र समर्हणं निधाय - ज्याच्या ठिकाणी पूजा अर्पून - जगत्रयेन्द्रतां आप - त्रैलोक्याचे आधिपत्य मिळविता झाला - वा - आणि - सौगन्धिकगन्धि - पांढर्या कमळाप्रमाणे आहे सुवास ज्यांचा असे - यत् - जे - विहारे - रासक्रीडेच्या प्रसंगी - स्पर्शेन - स्पर्शाने - व्रजयोषितां श्रमं अपानुदत् - गोकुळवासी स्त्रियांचे श्रम दूर करते झाले. ॥१७॥ (यदि) अपि - जरीही - अहं - मी - प्रहितः - पाठविलेला - कंसस्य दूतः (अस्मि) - कंसाचा दूत आहे - विश्वदृक् अच्युतः - विश्वाचा साक्षी असा श्रीकृष्ण - मयि - माझ्या ठिकाणी - अरिबुद्धिं न उपैष्यति - शत्रुविषयक भावना धरणार नाही - क्षेत्रज्ञः यः - न जाणणारा असा जो - चेतसः अन्तः बहिः च (यत्) ईहितं - मनाच्या आत व बाहेर जे इच्छिलेले असेल - एतेत् - ते - अमलेन चक्षुषा - मलरहित अशा दृष्टीने - ईक्षति - पाहत असतो. ॥१८॥ अङ्घ्रिमूले अवहितं - पायाकडे लक्ष देणार्या - कृताञ्जलिं - केलेली आहे ओंजळ ज्याने अशा - मां - मला - आर्द्रया दृशा - दयार्द्र दृष्टीने - सस्मितं - हसत - अपि ईक्षिता - जर पाहील - सपदि - लगेच - अपध्वस्तसमस्तकिल्बिषः - नाहीशी झाली आहेत सर्व पातके ज्याची असा - वीतविशङकः - नाहीसे झाले आहेत संशय ज्याचे असा - ऊर्जितां मुदं - मोठया आनंदाला - वोढा - धारण करीन. ॥१९॥ अथ - नंतर - सुहृत्तमं - श्रेष्ठ मित्र अशा - ज्ञातिं - नातलग अशा - अनन्यदैवतं - ज्याला दुसरे दैवत नाही अशा - मां - मला - बृहद्भ्यां दोर्भ्यां - विशाल अशा दोन्ही हातांनी - यदा - जेव्हा - परिरप्स्यते - आलिंगन देईल - तदा एव - तेव्हाच - मे आत्मा तीर्थीक्रियते - माझा आत्मा पवित्र होईल - च - आणि - अतः - ह्यापुढे - (मे) कर्मात्मकः बन्धः - माझे कर्मरूप बंधन - उच्छ्वसिति - संपेल. ॥२०॥ उरुश्रवाः (कृष्णः) - श्रेष्ठ आहे कीर्ति ज्याची असा श्रीकृष्ण - लब्धाङगसङगं - प्राप्त झाला आहे शरीरस्पर्श ज्याला अशा - प्रणतं - अत्यंत नम्र अशा - कृताञ्जलिं - केली आहे ओंजळ ज्याने अशा - मा - मला - तत अक्रूर - हे अक्रूरा - इति वक्ष्यते - असे म्हणेल - तदा - तेव्हा - वयं - आम्ही - जन्मभृतः - ज्यांचे जीवित सफल झाले आहे असे - महीयसा (तेन) - श्रेष्ठ अशा त्याने - यः न आदृतः - जो आदरिला नाही - अमुष्य तत् जन्म धिक् - त्याच्या त्या जन्माला धिक्कार असो. ॥२१॥ तस्य - त्याला - कश्चित् - कोणी - दयितः - प्रिय असा - च - आणि - सुहृत्तमः - अत्यंत मित्र असा - न - नाही - अप्रियः - नावडता - द्वेष्यः - द्वेष करण्यास योग्य असा - वा - किंवा - उपेक्ष्यः - उपेक्षा करण्यास योग्य असा - न एव (अस्ति) - नाहीच - तथापि - तरीसुद्धा - यद्वत् - ज्याप्रमाणे - सुरद्रुमः - कल्पवृक्ष - उपाश्रितः (सन्) - उपासना केली असता - अर्थदः (भवति) - इच्छिलेली वस्तु देणारा होतो - वयं - आम्ही - जन्मभृतः - ज्यांचे जीवित सफल झाले आहे असे - महीयसा (तेन) - श्रेष्ठ अशा त्याने - यः न आदृतः - जो आदरिला नाही - अमुष्य तत् जन्म धिक् - त्याच्या त्या जन्माला धिक्कार असो - तद्वत् - त्याप्रमाणे - भक्तान् - भक्तांना - यथा तथा - योग्यतेप्रमाणे - भजते - सेवितो. ॥२२॥ किं च - आणखी - यदूत्तमः अग्रजः - यादवांमध्ये श्रेष्ठ असा वडील बंधू - स्मयन् (सन्) - हसत - परिष्वज्य - आलिंगन देऊन - अवनतं - नम्र अशा - अञ्जलौ गृहीतं - ओंजळीचे ठिकाणी धरलेल्या अशा - गृहं प्रवेश्य - घरात नेऊन - आप्तसमस्तसत्कृतं - सगळ्या आप्तांनी सत्कारिलेल्या अशा - मा - मला - स्वबन्धुषु - आपल्या बांधवांमध्ये - कंसकृतं - कंसाच्या कृत्याविषयी - संप्रचक्षते - प्रश्न करील. ॥२३॥ नृप - हे राजा - अध्वनि - मार्गात - इति - याप्रमाणे - कृष्णं संचिन्तयन् - श्रीकृष्णाचे चिंतन करीत - श्वफल्कतनयः - अक्रूर - रथेन - रथाने - गोकुलं प्राप्तः - गोकुळात आला - च - आणि - सूर्यः अस्तगिरिं प्राप्तः - सूर्य अस्तगिरीला प्राप्त झाला. ॥२४॥ गोष्ठे - गौळवाडयात - अखिललोकपाल - सर्व राजे लोकांच्या - किरीटजुष्टामलपादरेणोः - मुकुटांनी सेविली आहे निर्मळ अशी पायधूळ ज्याची अशा - तस्य - त्याची - क्षितिकौतुकानि - पृथ्वीला आश्चर्यकारक अशी - अब्जयवाङ्कुशाद्यैः विलक्षितानि - कमळ, यव, अंकुश इत्यादि आकृतींनी चिन्हीत झालेली - पदानि - पाउले - ददर्श - पाहता झाला. ॥२५॥ तद्दर्शनाह्लादविवृद्धसंभ्रमः - त्यांच्या दर्शनाच्या आनंदाने वाढली आहे घाई ज्याची असा - प्रेम्णा ऊर्ध्वरोमा - प्रेमाने उभे राहिले रोमांच ज्याचे असा - अश्रुकलाकुलेक्षणः - अश्रूंनी व्याकुळ झाले आहेत डोळे ज्याचे असा - सः - तो - रथात् अवस्कन्द्य - रथातून खाली उतरून - अहो अमूनिप्रभोः अङ्घ्रिजांसि - अहो ही श्रीकृष्णाची पायधूळ - इति (उक्त्वा) - असे म्हणून - अचेष्टत - तीत लोळला. ॥२६॥ सन्देशात् (आरभ्य) - निरोपापासून आरंभ करून - दम्भं भियं शुचं च हित्वा - गर्व, भीति व शोक टाकून - हरेः लिङगदर्शनश्रवणादिभिः - श्रीकृष्णाचे दर्शन, लीलांचे श्रवण इत्यादिकांनी - यः जातः - जो उत्पन्न झाला - इयान् (एव) - एवढाच - देहंभृतां - देहधारी प्राण्यांचा - अर्थः (अस्ति) - पुरुषार्थ होय. ॥२७॥ व्रजेगोदोहनं गतौ - गोठयात गाईंचे दूध काढण्यास गेलेल्या अशा - पीतनीलाम्बरधरौ - पिवळे व निळे अशी वस्त्रे धारण करणार्या - शरदम्बुरुहेक्षणौ - शरत्कालातील कमळाप्रमाणे आहेत डोळे ज्यांचे अशा - कृष्णं रामं च - श्रीकृष्णाला व बलरामाला - ददर्श - तो पाहता झाला. ॥२८॥ किशोरौ - अकरा ते पंधरा वर्षांच्या वयाचे अशा - श्यामलश्वेतौ - सावळ्या व गोर्या अशा - श्रीनिकेतौ - सौंदर्याचे निवासस्थान अशा - बृहद्भुजौ - विशाल आहेत दंड ज्यांचे अशा - सुमुखौ - सुंदर आहेत मुखे ज्यांची अशा - सुन्दरवरौ - सुंदर व श्रेष्ठ अशा - बालद्विरदविक्रमौ - लहानग्या हत्तीप्रमाणे आहे पराक्रम ज्यांचा अशा. ॥२९॥ ध्वजवज्राङ्कुशाम्भोजैः - ध्वज, वज्र, अंकुश व कमळ - चिह्नितैः अङ्घ्रिभिः - या खुणांनी युक्त असलेल्या पायांनी - व्रजं शोभयन्तौ - गोठयाला सुशोभित करणार्या - महात्मानौ - उदार आहे मन ज्यांचे अशा - अनुक्रोशस्मितेक्षणौ - दया व हास्य यांनी युक्त आहेत डोळे ज्यांचे अशा. ॥३०॥ उदाररुचिरक्रीडौ - उच्च प्रतीचे व सुंदर आहेत खेळ ज्यांचे अशा - स्रग्विणौ - फुलांच्या माळा धारण करणार्या - वनमालिनौ - पायापर्यंत लोंबणार्या रानफुलांच्या माला धारण करणार्या - स्नातौ - स्नान केलेल्या - पुण्यगन्धानुलिप्ताङगौ - सुवासिक उटयांनी माखलेली आहेत शरीरे ज्यांची अशा - विरजवाससौ - निर्मळ आहेत वस्त्रे ज्यांची अशा. ॥३१॥ जगद्धेत् - जगाचे कारण अशा - जगत्पती - जगाचे पालक अशा - जगत्यर्थे स्वांशेन अवतीर्णौ - पृथ्वीच्या हितासाठी आपापल्या अंशाने अवतरलेल्या - आद्यौ - सर्वांच्या आधी असलेल्या अशा - प्रधानपुरुषौ - श्रेष्ठ पुरुष अशा - बलकेशवौ - बळराम व श्रीकृष्ण यांना. ॥३२॥ राजन् - हे राजा - स्वया प्रभया - आपल्या तेजाने - दिशः - दिशांना - वितिमिराः - अंधकाररहित - कुर्वाणौ - करणार्या - यथा कनकाचितौ - ज्याप्रमाणे सोन्याने वेष्टिलेले - मारकतः रौप्यः शैलः - पाचेचा व रुप्याचा असे दोन पर्वत - तथा वर्तमानौ - त्याप्रमाणे असणार्या अशा - कृष्णं रामं च ददर्श - श्रीकृष्ण व बळराम यांना तो पाहता झाला. ॥३३॥ स्नेहविव्हलः सः अक्रूरः - प्रेमाने गोंधळलेला असा तो अक्रूर - रथात् तूर्णं अवप्लुत्य - रथातून त्वरेने खाली उतरून - रामकृष्णयोः चरणोपान्ते - बलराम व श्रीकृष्ण यांच्या पायांजवळ - दण्डवत् पपात - काठीप्रमाणे पडला. ॥३४॥ नृप - हे राजा - भगवद्दर्शन - भगवंताच्या भेटीमुळे - आह्लादबाष्पपर्याकुलेक्षणः - आनंदाश्रूंनी भरले आहेत डोळे ज्याचे असा - पुलकाचिताङगः - रोमांचांनी युक्त आहे शरीर ज्याचे असा - औत्कण्ठयात् - उत्कंठेमुळे - स्वाख्याने - आपले नाव सांगण्याविषयी - न अशकत् - समर्थ झाला नाही. ॥३५॥ प्रणतवत्सलः भगवान् - नम्र अशा प्राण्यांवर प्रेम करणारा श्रीकृष्ण - तं अभिप्रेत्य प्रीतः - त्याला पाहून संतुष्ट झालेला - रथाङगाङ्कितपाणिना - चक्राच्या चिन्हाने युक्त अशा हाताने - अभ्युपाकृष्य - जवळ ओढून - परिरेभे - आलिंगन देता झाला. ॥३६॥ च - आणि - महात्मना - उदार आहे मन ज्याचे असा - सानुजः - धाकटया भावासह - संकर्षणः - बलराम - प्रणतं (तं) उपगुह्य - नम्र अशा त्याला आलिंगून - पाणिना (तस्य) पाणी गृहीत्वा - आपल्या हाताने त्याचे दोन्ही हात धरून - गृहं अनयत् - घरात नेता झाला. ॥३७॥ अथ - नंतर - तस्मै स्वागतं पृष्टवा - त्याला कुशल विचारून - वरासनं निवेद्य - उत्तम आसन देऊन - विधिवत् पादौ प्रक्षाल्य - शास्त्रात सांगितल्याप्रमाणे पाय धुवून - मधुपर्कार्हणं आहरत् - मधुपर्काच्या पूजेचे साहित्य आणता झाला. ॥३८॥ आदृतः विभुः - आदरयुक्त असा बलराम - अतिथये (तस्मै) - पाहुणा आलेल्या त्या अक्रूराला - गां निवेद्य - गाय देऊन - श्रान्तं (तं) संवाह्य - दमलेल्या अशा त्याचे पाय रगडून - च - आणि - श्रद्धया - भक्तीने - बहुगुणं मेध्यं अन्नं - पुष्कळ आहेत गुण ज्यांमध्ये असे पवित्र अन्न - उपाहरत् - अर्पण करिता झाला. ॥३९॥ परमधर्मवित् रामः - श्रेष्ठ धर्म जाणणारा बलराम - भुक्तवते तस्मै - भोजन केलेल्या त्याला - प्रीत्या - प्रेमाने - मुखवासैः - मुखाला सुवास देणार्या तांबूलादि पदार्थांनी - गन्धमाल्यैः - सुगंधी पदार्थांनी व फुलांनी - पुनः - पुनः - परां प्रीतिं व्यधात् - मोठा संतोष देता झाला. ॥४०॥ सतकृत्ं (तं) नन्दः पप्रच्छ - सत्कारलेल्या अशा त्या अक्रूराला नंद विचारिता झाला - दाशार्ह - हे दाशार्हा - निरनुग्रहे कंसे जीवति - निर्दय कंस जिवंत असता - सौनपालाः अवयः इव - खाटिकाने पाळलेल्या मेंढयासारखे - कथं स्थ - तुम्ही कसे राहता. ॥४१॥ असुतृप् खलः यः - इंद्रियांची तृप्ति करणारा दुष्ट असा जो - क्रोशन्त्या स्वस्वसुः - आक्रोश करणार्या आपल्या बहिणीच्या - तोकान् अवधीत् - मुलांना ठार मारिता झाला - तत्प्रजानां वः - त्याच्या प्रजा अशा तुमची - कुशलं - खुशाली - किं नु स्वित् - कशी बरे - विमृशामहे - आम्ही मनात आणावी. ॥४२॥ नन्देन - नंदाने - इत्थं - अशाप्रकारे - सूनृतया वाचा - सत्य व प्रिय अशा भाषणाने - सुसभाजितः अक्रूरः - उत्तमप्रकारे सत्कारिलेला अक्रूर - परिपृष्टेन - प्रश्नाच्या योगाने - अध्वपरिश्रमं जहौ - मार्गातील थकवा टाकिता झाला. ॥४३॥ अध्याय अडतिसावा समाप्त |